'या' व्यक्तीसोबत मिळून घेणार इराण युद्ध थांबविण्याचा निर्णय; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:08 IST2026-03-09T10:07:57+5:302026-03-09T10:08:39+5:30

Donald Trump Iran WAR: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत 'टाइम्स ऑफ इस्रायल'ला दिलेल्या मुलाखतीत मोठे संकेत दिले आहेत.

Donald Trump Iran WAR: When will the Iran war end? Donald Trump's big statement; Will make the final decision together with 'this' person | 'या' व्यक्तीसोबत मिळून घेणार इराण युद्ध थांबविण्याचा निर्णय; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

'या' व्यक्तीसोबत मिळून घेणार इराण युद्ध थांबविण्याचा निर्णय; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाबाबत अत्यंत महत्त्वाचे संकेत दिले आहेत. "इराणसोबतचे युद्ध कधी संपवायचे, याचा निर्णय मी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करून एकत्रितपणे घेईन," असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी 'द टाइम्स ऑफ इस्रायल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, युद्धाचा अंत हा एक 'म्युच्युअल' (परस्पर) निर्णय असेल. आम्ही सातत्याने संपर्कात आहोत आणि योग्य वेळ आल्यावर मी अंतिम निर्णय देईन. जर मी आणि नेतन्याहू यांनी वेळीच पाऊल उचलले नसते, तर इराणने इस्रायलचा विनाश केला असता. आता आम्ही त्यांना अशा स्थितीत आणले आहे की ते पुन्हा डोके वर काढू शकणार नाहीत.

ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा इराणने मोजतबा खामेनेई यांची नवा सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती केली आहे. ट्रम्प यांनी मोजतबा यांना 'लाईटवेट' संबोधले असून, अमेरिकेच्या मान्यतेशिवाय ते फार काळ टिकणार नाहीत, असा इशाराही दिला आहे. 

कतारचे युद्ध थांबविण्याचे प्रयत्न...

दरम्यान, कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांनी सर्व देशांना तणाव कमी करण्याचे आवाहन केले असून, इराणने खाडी देशांवरील हल्ले तातडीने थांबवावेत, अशी विनंती केली आहे. कतार सातत्याने इराणच्या संपर्कात असून या प्रदेशातील तणाव निवळण्यासाठी प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांतील युद्धाच्या घटनांमुळे इराणसोबतच्या विश्वासाला मोठा तडा गेल्याचे त्यांनी मान्य केले. विशेषतः अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने केलेल्या प्रतिहल्ल्यामुळे परिस्थिती बिघडली आहे, असे ते म्हणाले. इराणने सर्वात आधी खाडी देशांवर आणि या युद्धात थेट सहभागी नसलेल्या देशांवर होणारे हल्ले थांबवले पाहिजेत, असे ते म्हणाले. 
 

Web Title : ईरान युद्ध कब थमेगा? ट्रम्प नेतन्याहू संग लेंगे फैसला

Web Summary : ट्रम्प का कहना है कि ईरान युद्ध का अंत नेतन्याहू के साथ आपसी फैसले पर निर्भर है। कतर ने खाड़ी देशों पर हमले रोकने का आग्रह किया।

Web Title : Iran War End? Trump to decide with Netanyahu: Report

Web Summary : Trump says Iran war's end depends on mutual decision with Netanyahu. He added Iran cannot recover now, Qatar urges de-escalation after attacks.