शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

पाकचे पंतप्रधान इम्रान यांनी पुन्हा आळवला काश्मीरचा राग, ट्रम्प यांची मध्यस्थीची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 08:56 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ट्रम्प यांच्या भेटीनंतर इम्रान म्हणाले, काश्मीरसह इतर मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आहे. आम्ही भारत-पाकिस्तानसंबंधी काश्मीरच्या मुद्द्यावर विचार करत आहोत. जर आम्हाला शक्य झाल्यास नक्कीच मदत करू.

दावोसः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्रम्प यांची भेट घेतली असता, पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्याची भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली. ट्रम्प यांच्या भेटीनंतर इम्रान म्हणाले, काश्मीरसह इतर मुद्द्यांवर आम्ही चर्चा केली आहे. आम्ही भारत-पाकिस्तानसंबंधी काश्मीरच्या मुद्द्यावर विचार करत आहोत. जर आम्हाला शक्य झाल्यास नक्कीच मदत करू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीसुद्धा काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा प्रकट केली होती. परंतु भारतानं त्यांची मागणी धुडकावून लावली होती. काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा असून कोणत्याही तिसऱ्या देशानं यात मध्यस्थता करण्याची गरज नसल्याचं मोदी सरकारनं सांगितलं होतं. दोन्ही देशांना बोलायचं आहे 'हॅलो'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तान दौऱ्यासंबंधी काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. भारताचा दौरा केल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये जाणार आहेत का?, सध्या तरी असा काहीही प्लॅन नसल्याचं इम्रान खान यांनी सांगितलं. परंतु दोन्ही देशांना मी 'हॅलो' बोलू इच्छितो. कारण या दोन्ही देशांबरोबर आमचे फार जुने संबंध आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करताना पाकिस्तान आणि भारतादरम्यान अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या काश्मीर मुद्द्यावर भाष्य केलं होतं. काश्मीरच्या मुद्द्यावर मी दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी संपर्कात आहे. अमेरिकेची काश्मीरच्या मुद्द्यावर बारीक नजर आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पImran Khanइम्रान खानJammu Kashmirजम्मू-काश्मीर