शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना म्हणजे निव्वळ लबाडी' म्हणत तरुण कोविड पार्टीला गेला अन् धक्कादायक प्रकार घडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 16:37 IST

अमेरिकेतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; कोरोना पार्ट्यांमुळे वाढली चिंता

टेक्सास: जगातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा सव्वा कोटींच्या पुढे गेला असून त्यात अमेरिकेतील नागरिकांचं प्रमाण लक्षणीय आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असल्याचं आतापर्यंत दिसून येत होतं. मात्र आता तरुणांनादेखील कोरोनाचा मोठा धोका असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. अमेरिकेत कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव होत आहे. त्यात आता तरुणांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कोरोना पार्ट्यांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोणाची रोगप्रतिकारशक्ती अधिक आणि कोणाला लवकर कोरोनाची लागण होणार, हे पाहण्यासाठी अमेरिकेत काही ठिकाणी कोरोना पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत आहे. टेक्सासमध्ये अशाच एका पार्टीला उपस्थित राहिलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.टेक्सासमध्ये एका कोरोना रुग्णानं पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोमधल्या मेथोडिस्ट रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जेन ऍपलबाय यांनी याबद्दलची माहिती दिली. कोरोना म्हणजे थट्टेखातर करण्यात आलेली लबाडी असल्याची तरुणाची समजूत होती. मात्र कोरोनाची लागण झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. 'एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो त्याच्या मित्रांसाठी पार्टीचं आयोजन करतो. मित्रांना कोरोना झाल्यास ते त्यावर मात करू शकतात का, त्यांची रोगप्रतिकार क्षमता किती, हे पाहण्यासाठी पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत आहे,' अशी माहिती ऍपलबाय यांनी दिली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे मृत पावलेल्या तरूणानं त्याच्या शेवटच्या क्षणी पार्टीला जाऊन आपण चूक केल्याचं म्हटलं.कोरोना म्हणजे थट्टेखातर करण्यात आलेली लबाडी असल्याचं तरुणाचं मत होतं. आपण तरूण असल्यानं कोरोनाची लागण होणार नाही, असा ठाम विश्वास त्याला होता. त्यामुळेच तो कोरोना पार्टीला गेला, अशी माहिती ऍपलबाय यांनी दिली. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा १ लाख ३५ हजारांहून अधिक आहे. मात्र अद्यापही अनेकांना कोरोनाचं गांभीर्य समजलेलं नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या