शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जगात पहिली कोरोना लस रशियाने केली तयार; ब्लादमीर पुतीन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 06:42 IST

रशिया म्हणतो, दोन वर्षे राहतो या लसीचा प्रभाव; डब्ल्यूएचओ म्हणते, मान्यतेसाठी सुरक्षेचा डेटा हवाच

मॉस्को : कोरोनावर लस कोण पहिल्यांदा विकसीत करते, याची जगात स्पर्धा सुरू असतानाच रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतीन यांनी लस तयार झाल्याची घोषणा के ली आहे. एवढेच नाही तर ती लस आपल्या मुलीलाही देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. जगातील ही पहिली कोरोना लस आहे असा दावा त्यांनी केला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने मात्र या लसीला मान्यता मिळण्यासाठी सुरक्षेच्या डेटाचा आढावा घेणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.रशियाने या लसीचे नाव ‘स्पुटनिक व्ही’ असे नाव दिले आहे. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. या लसीच्या विकासासाठी आर्थिक मदत करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रेव्ह यांनी सांगितले की, या लसीची तिसºया टप्प्यातील चाचणी बुधवारी सुरू करण्यात आली आहे. या लसीचा प्रभाव दोन वर्ष राहतो असा दावा, रशियाच्या आरोग्य खात्यानं केला आहे. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, ही नोंदणी सशर्त करण्यात आली आहे. या लसीचे उत्पादन सुरू असताना त्याच्या चाचण्याही सुरू ठेवण्यात येणार आहेत.पुतीन म्हणाले, माझ्या मुलीलाही दिली लसमंगळवारी सकाळी करोनाविरोधातील जगातील पहिल्या लसीची नोंदणी करण्यात आली आहे. ही जगासाठी आशादायी बाब आहे. लस विकसीत करण्यासाठी कष्ट घेण्यारांचा मी ऋणी आहे.ही लस सगळ््या आवश्यक चाचण्यांमधून यशस्वी झाली आहे. ही लस प्रभावी आहे. या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात निर्माण होते. माझ्या दोनपैकी एका मुलीला ही लस देण्यात आली आहे. तिची तब्येतही उत्तम आहे. लवकरच देशात या लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येणार आहे.या लसीला डब्ल्यूएचओने मान्यता दिली का?अजून या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळालेली नाही. त्याबाबत डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, कोणत्याही लसीला मान्यता देण्यासाठी सुरक्षेसंदर्भातील माहितीचा आढावा घेणे गरजेचे असते. लसीच्या उत्पादनासाठी ती सुरक्षित असल्याचा डब्ल्यूएचओचा ‘स्टॅम्प’ आवश्यक असतो.165 प्रकारच्या लसींवर सध्या काम सुरू आहे.139 लसी सध्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात आहेत.26 लसींची सध्या मानवावर चाचणी06लसींची (वरील २६ पैकी) मानवावर तिसºया टप्प्याची चाचणी सुरू आहे.रशियन लसीसाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षानवी दिल्ली : रशियन लसीसाठी भारतीयांना मात्र प्रतीक्षा करावी लागेल. केंद्र सरकारने लस विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला परदेशी लस स्वदेशात आणण्यासंबंधी निर्णयाचे अधिकार असतात व याच समितीची बैठक बुधवारी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. रशियन लसीचा थेट उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन