शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

CoronaVirus News : नववीतल्या विद्यार्थ्यानं तयार केली वेबसाईट; कोरोनाच्या खात्रीशीर माहितीचं संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 1:42 PM

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगातील सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 64 लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 382,709 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 6,463,647 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनावर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. जगभरात युद्धपातळीवर लस शोधण्याचं काम सुरू आहे. अनेक देशांमध्ये संशोधन केलं जात आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्ग रोखण्यासाठी मास्क, क्वारंटाईन, सोशल डिस्टंसिंग यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत. याच दरम्यान कोरोनाची सर्व माहिती म्हणजेच लस आणि इतर गोष्टींबाबत अनेक गोष्टी लोक इंटरनेटवर सर्च करत आहेत. मात्र एकत्रित अशी आवश्यक असलेली माहिती एका क्लिकवर उपलब्ध नाही. यासाठी एका नववीत शिकणाऱ्या मुलाने पुढाकार घेतला आहे. कोविड-19 संबंधित औषधे, लस, उपचार आणि इतरही सर्व माहिती एकाच ठिकाणी सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी एक खास वेबसाईट तयार केली आहे. कोरोनाच्या खात्रीशीर माहितीचं संकलन करण्यात आलं आहे. 

आरव बदानी असं या मुलांचं नाव असून त्याने FixCovid.org ही वेबसाईट तयार केली आहे. आरव कॅलिफोर्नियातील सॅराटोगा हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकतो. कोरोनाशी संबंधित काही माहिती सर्च करत असताना आरवला विविध समस्या जाणवल्या. लोकांना उपयुक्त होईल यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असणं त्याला गरजेचं वाटलं. यासाठीच त्याने  स्वत: वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेतला आणि FixCovid.org ही वेबसाईट तयार केली. विविध भाषांमध्ये ही वेबसाईट उपलब्ध असून खात्रीशीर माहितीचं संकलन यावर करण्यात आले आहे. कोरोनाची योग्य माहिती मिळत असल्याने लोकांसाठी हे अत्यंत फायदेशीर ठरत आहे. 

जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही कोरोनाशी संबंधित माहिती देत असते. आरवने तयार केलेल्या वेबसाईटवर कोविड-19 च्या सर्व ताज्या बातम्या, माहिती, संशोधन सुरू असलेली औषधे आणि लसची माहिती उपलब्ध आहे. आरवचं सर्वत्र कौतुक केलं जात असून त्यांची ही वेबसाईट उपयुक्त ठरत आहे. कोरोनामुळे देशातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल दोन लाखांच्यावर गेला आहे. वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तसेच योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : आनंदाची बातमी! माणसांप्रमाणे आता प्राण्यांसाठी कोरोनाची लस येणार, भविष्यातील धोका टळणार

CoronaVirus News : आता 'या' वयोगटातील चिमुकल्यांवर होणार कोरोनाच्या लसीची चाचणी?

CoronaVirus News : बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय... कोरोना योद्ध्याच्या लेकीने लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र

CoronaVirus News : लय भारी! कपडे असो वा वस्तू 'या' भन्नाट उपकरणाच्या मदतीने होणार व्हायरसमुक्त 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCaliforniaकॅलिफोर्नियाStudentविद्यार्थीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIndiaभारतDeathमृत्यू