शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: 'त्यांनी' अल्लाहची माफी मागावी; ट्रोल झाल्यानंतर इम्रान खान यांच्याकडून ट्विट डिलीट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 17:48 IST

त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासीयांना एक संदेश लिहिला होता.

इस्लामाबादः जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. अनेक देशांत लॉकडाऊनची परिस्थिती असून, 'शब-ए-बारातसाठी' मुस्लीम धर्मियांनी घराबाहेर पडू नये. तसेच शब-ए-बारातची नमाज मशिदीतदेखील अदा करू नये, असे आवाहन मुस्लिम बांधवांना करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशवासीयांना एक संदेश लिहिला होता.ट्विटमध्ये ते लिहितात, मी जगभरातील मुस्लिमांना विनंती करतो की, आज रात्री शब-ए-बारातनिमित्त खासकरून नाफिल नमाजनिमित्त अल्लाहची प्रार्थना करावी आणि त्यांच्याकडे क्षमा आणि आशीर्वाद घ्यावेत. ' मात्र, ट्रोल झाल्यावर त्यांनी ते ट्विट एका तासात हटवले आहे. गुरुवारी पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 248 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह संक्रमित कोरोनाची संख्या 4,322 वर गेली आहे. दोन आठवड्यांच्या लॉकडाऊननंतरही अनेकांना विषाणूचा प्रसार लवकर थांबविण्यात अडचणी येत आहेत. राष्ट्रीय आरोग्य सेवा मंत्रालयाच्या मते, या संसर्गामुळे देशात आतापर्यंत 63 लोकांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू एका दिवसात झाला आहे. आतापर्यंत एकूण 572 लोक कोरोनातून बरे झाले असून, 31 लोकांची प्रकृती गंभीर आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीसुद्धा या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच त्यांना वैद्यकीय मदतही पुरवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधली विमान सेवाही खंडित करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊन केलेल्या शहरांत शाळा, कॉलेज, दुकानं, ऑफिस, बाजार, मॉल्स, सिनेमागृह हे सर्व बंद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सुविधाच सुरू राहणार आहेत. दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा अमानुष चेहरा समोर आला. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान कराचीमध्ये प्रशासनाने हिंदूंना रेशन देण्यास नकार दिला आहे. कराचीच्या रेहड़ी घोथमध्ये हजारो गरीब लोक धान्य आणि दैनंदिन गोष्टींकडे पोहचले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर अनेक हिंदूंच्या वाट्याला निराशा आली. त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही इथून जा, रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. तेथील सिंध प्रशासनाने स्थानिक गरीब मजुरांना रेशन वाटप करण्याची व्यवस्था केली होती.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानcorona virusकोरोना वायरस बातम्या