शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Corona Virus: चीननं घेतला कोरोना व्हायरसचा धसका; हस्तांदोलन करण्यावरही घातली बंदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:23 AM

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे.

शंघाई - चीनमध्ये दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसने भयंकर स्वरुप धारण केलं आहे. कोरोना व्हायरस दिवसेंदिवस चीनमध्ये पसरत असून अनेक जण या आजाराचा शिकार होत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या आजाराचं कोणतंही लक्षण लगेच आढळून येत नाही. हा आजार इतका धोकादायक आहे की, वुहानमध्ये लोकांना स्वत:ला घरात कैद करुन ठेवलं आहे. शहरात कोणालाही मुक्त फिरण्याची परवानगी नाही. इतकचं काय तर पेइचिंगमध्ये लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलन करु नये असंही बजावण्यात आलं आहे. 

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणा चीनच्या बाहेर थायलँड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि फ्रान्सपर्यंत या व्हायरसला रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

नव्या व्हायरसने जग सतर्कअद्याप या व्हायरसची माहिती नसल्याने जगाला सतर्क करण्यात आलं आहे. हा भयंकर आजार कशामुळे पसरत आहे याची माहिती आरोग्य यंत्रणांकडे नाही. या आजारामुळे न्यूमोनिया होऊ शकतो तसेच आणखी गंभीर आजार उद्भवू शकतो. 

आजाराची लक्षणाची अपुरी माहितीचीनचे आरोग्य मंत्री शीहावे यांनी सांगितलं की, या व्हायरसचा परिणाम १४ दिवसांपुरता आहे. यादरम्यान हा व्हायरस संसर्गजन्य रोगासारखा लोकांच्या शरीरात पसरत आहे. या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं कठीण होतंय. २००२-०३ मध्येही अशाप्रकारे हा व्हायरस पसरल्यामुळे ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये सध्या २ हजार लोक या व्हायरसमुळे पीडित आहे तर ८० जणांचा मृत्यू झाला आहे. 

चीनमध्ये हस्तांदोलन करण्यास बंदीचीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना एकमेकांशी हस्तांदोलन करु नये असं आवाहन केलं आहे. चीनच्या नववर्षानंतर शाळा-कॉलेज सुरु होणार होते मात्र त्यांनाही सुट्टी देण्यात आली आहे. हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंच्या धास्तीने शांघाई डिज्निलँड या आठवड्यात पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना