शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जॉर्डनमध्ये व्यंगचित्रावरून ख्रिश्चन लेखकाची हत्या

By admin | Updated: September 26, 2016 00:36 IST

जॉर्डनचे प्रसिद्ध ख्रिश्चन लेखक नाहेद हत्तार (५६) यांची रविवारी न्यायालयाबाहेर बंदूकधाऱ्याने तीन गोळ्या घालून हत्या केली

अम्मान : जॉर्डनचे प्रसिद्ध ख्रिश्चन लेखक नाहेद हत्तार (५६) यांची रविवारी न्यायालयाबाहेर बंदूकधाऱ्याने तीन गोळ््या घालून हत्या केली. इस्लामचा अपमान करणारे व्यंगचित्र हत्तार यांनी फेसबुकवर शेअर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्या खटल्यासाठीच ते न्यायालयात आले होते, असे जॉर्डनची अधिकृत वृत्तसंस्था पेट्रोने म्हटले. मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे. हे न्यायालय अम्मानच्या अब्दाली जिल्ह्यात आहे. हत्तार यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ‘दाढी असलेला माणूस स्वर्गात अंथरुणावर महिलेसोबत पडून धुम्रपान करतोय आणि देवाला माझ्यासाठी दारू आणि काजू आण’, असे सांगतोय असे व्यंगचित्र पोस्ट केले होते. याबद्दल हत्तार यांना १३ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांची आणि देव व स्वर्ग याबद्दलच्या त्यांच्या (दहशतवादी) संकल्पनेची थट्टा व्यंगचित्रात होती. त्यात देवत्वाचा कोणत्याही प्रकारे भंग होत नाही, असे म्हणून हत्तार यांनी व्यंगचित्र फेसबुकवरून काढून टाकले होते. परंतु हे व्यंगचित्र नेमके कोणी तयार केले हे कळू शकलेले नाही. जॉर्डनच्या अनेक मुस्लिमांना ते व्यंगचित्र अपमानकारक व त्यांच्या धर्माविरुद्ध असल्याचे वाटले. ते व्यंगचित्र मोठ्या प्रमाणावर शेअर करून हत्तार यांनी कायद्याचे उल्लंघन केले, असे अधिकाऱ्यांनी म्हटले.