शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 7:13 PM

रशियाचा अधिकांश व्यापार याच पोर्टवरून चालतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी येथेच जर्मनी आणि रशियन सैन्यात भीषण युद्ध झाले होते. 

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वीच चीन आणि रशिया यांच्यात वादही निर्माण झाला होता.चीनच्या गुप्तचर संस्थेने पाणबुडीशी संबंधित टॉप सिक्रेट फाइल चोरल्याचा आरोप रशियाने केला होता.दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी येथेच जर्मनी आणि रशियन सैन्यात भीषण युद्ध झाले होते. 

पेइचिंग -भारतासोबत लडाखमध्ये सीमा वाद वाढवणाऱ्या चीनने आता थेट रशियाच्याच व्लादिवोस्तोकवर आपला दावा सांगितला आहे. चीनमधील सरकारी वृत्त वाहिनी सीजीटीएनचे संपादक शेन सिवई यांनी हा दावा केला आहे. ते म्हणाले, रशियातील व्लादिवोस्तोक शहर हे 1860पूर्वी चीनचाच भाग होते. एवढेच नाही, तर या शहराला पूर्वी हैशेनवाई म्हटले जाईल, ते एकतर्फी संधी करून रशियाने चीनकडून हिसकावले, असेही त्यांनी म्हटले आहे.

सीजीटीएनच्या संपादकांचे म्हणणे महत्वाचे - चीनमधील सर्वच माध्यमं सरकारी आहेत. यात काम करणारे लोक चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या इशाऱ्यावरच लिखान करतात आणि बोलतात. चीनी माध्यमांत लिहिली गेलेली प्रत्येक गोष्ट तेथील सरकारचा विचार दर्शवते. यामुळे शेन सिवई यांचे ट्विट अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. काही दिवसांपूर्वीच चीन आणि रशिया यांच्यात वादही निर्माण झाला होता.

पाणबुडीशी संबंधित महत्वाची फाइल चोरल्याचा आरोप -काही दिवसांपूर्वी चीनच्या गुप्तचर संस्थेने पाणबुडीशी संबंधित टॉप सिक्रेट फाइल चोरल्याचा आरोप रशियाने केला होता. याप्रकरणी रशियाने आपल्या एका नागरिकालाही अटक केली होती. एवढेच नाही, तर त्याच्यावर देशद्रोहाचा आरोपही ठेवण्यात आला होता. संबंधित आरोपी हा रशियन सरकारमध्ये मोठ्या पदावर कार्यरत होता. त्यानेच ही फाईल चीनला सोपवली होती.

आशियातील या देशांना चीनपासून धोका -आशियातील चीनच्या विस्तारवादी नीतीचा सर्वाधिक धोका भारताला आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे, भारत-चीन सद्यस्थिती. याशिवाय, चीन आणि जपान यांच्यात पूर्व चीन समुद्रातील बेटांवरून वाद सुरू आहे. नुकतेच जपानने एका चिनी पाणबुडीला आपल्या भागातून पिटाळून लावले होते. चीनने अनेक वेळा तैवानवर उघडपणे सैन्य कारवाईची धमकी दिली आहे. तसेच फिलिपाइन्स, मलेशिया आणि इंडोनेशियासोबतही चीनचा वाद आहे.

व्लादिवोस्तोक रशियन सैन्याचा मोठा अड्डा -रशियाचे व्लादिवोस्तोक शहर हे प्रशांत महासागरात तैनात असलेल्या रशियन सैन्याचे मुख्य ठिकाण आहे. रशियाच्या उत्तर पूर्वेला असलेले हे शहर प्रिमोर्स्की क्राय राज्याची राजधानी आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सेमेजवळ आहे. व्यापारी आणि एतिहासिक दृष्टीने व्लादिवोस्तोक हे रशियाचे सर्वात महत्वाचे शहर आहे. रशियाचा अधिकांश व्यापार याच पोर्टवरून चालतो. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी येथेच जर्मनी आणि रशियन सैन्यात भीषण युद्ध झाले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

टॅग्स :border disputeसीमा वादrussiaरशियाchinaचीनIndiaभारतladakhलडाख