भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 05:16 PM2020-06-30T17:16:52+5:302020-06-30T17:54:02+5:30

भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख भागात निर्माण झालेल्या परिस्थितीने आता वेगळे वळण घेतले आहे. चीनचे फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टर्सची सीमेवरील हालचाल वाढली आहे. यानंतर भारतीय लष्करानेही आपली सर्वात आधुनिक एअर डिफेनस सिस्टम येथे तैनात केली आहे.

लष्कराने आपले 'आकाश' मिसाइल्सदेखील येथे पाठवली आहेत. ते कितीही वेगवान एअरक्राफ्ट अथवा ड्रोनला क्षणात राख करू शकतात. केवळ भारतच नाही, तर अमेरिकेनेही चीनचे मनसुबे ओळखले आहेत. आता त्याने आपले सैन्य यूरोपातून हलवून आशियामध्ये तैनात करायला सुरुवात केली आहे. 

अशा परिस्थितीतही ड्रॅगन शक्ती प्रदर्शन करत भारतासह संपूर्ण जगाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताकडेही काही अशी शस्त्रे आहेत, जी काही मिनिटांतच चीनला गुडघे टेकायला भाग पाडू शकतात. 

...तर चीनच्या कोणत्याही भागाला टार्गेट केले जाऊ शकते - भारताचे सर्वात घातक शस्त्र म्हणजे, न्यूक्लियर डिटरेंट अग्नी-5 मिसाइल सिस्टिम. 5,000 किलो मीटर एवढी मारक क्षमता असलेली ही मिसाइल सिस्टिम अन्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. अग्नी 5च्या निशाण्यावर संपूर्ण चीन येतो. यावरूनच अग्नी 5 किती घातक आहे, याचा अंदाज लावला जाऊ शतो. याचाच अर्थ भारताने अग्नी-5चा वापर केला तर चीनच्या कोणत्याही भागाला टार्गेट केले जाऊ शकते.

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, या मिसाइलने पेइचिंग, शंघाय, गुआंगझाऊ आणि हाँगकाँग सारख्या शहरांना सहज निशाणा बनवले जाऊ शकते. चीनमधील ही शहरे, राजकीय आणि औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची आहेत. अग्नी-5सह भारताचे मिसाइल्स लडाख अथवा गुवाहाटीतून चीनच्या पूर्वेकडील भागांत डागली गेली, तर चीन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतो.

​अग्नी-5 - अग्नी-5 ची पहिली टेस्ट 2012 मध्ये करण्यात आली होती. तसेच संपूर्ण अग्नी सिरीजमध्ये हे अत्यंत आधुनिक आहे. यात नेविगेशनसाठी मॉडर्न तत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अन्वस्त्र वाहून नेण्याची याची क्षमता इतर मिसाइल प्रणालीच्या तुलनेत फार चांगली आहे. सध्या केवळ अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि उत्तर कोरीया यांच्याकडेच इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाइल्स आहेत.

अग्नी-1 अग्नी सीरीजमधील अग्नी-1 बॅलेस्टिक मिसाइल 700 ते 1200 किलो मीटरपर्यंत आपले लक्ष्य अचूकपणे भेदू शकते. हे मिसाइल 2004मध्ये सर्वप्रथम सेवेत आले. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे सिंगल-स्टेज मिसाइल सॉलिड प्रॉपलँट्सने तयार केले आहे. याच्या सहाय्याने एक टन पेलोड वाहून नेले जाऊ शकते. याचे पेलोड कमी केल्यास याची रेंजदेखील वाढवली जाऊ शकते.

अग्नी-2 2,000 किलो मीटरपर्यंत सर्फेस टू सर्फेस शत्रूचा खात्मा करण्याची क्षमता असले अग्नी-2 बलेस्टिक मिसाइलदेखील अण्वस्त्र नेण्यास सक्षम आहे. विशेष म्हणजे या मिसाइलची रेंज आवश्यकता भासल्यास 3,000 किलो मीटरपर्यंतही वाढवली जाऊ शकते. हे मिसाइलदेखील चीनचा पश्चिमेकडील भाग, मध्यचीन आणि चीनच्या दक्षिणेकडील भागाला सहज चपाट्यात घेऊ शकते.

20 मीटर लांब असलेल्या दोन लेवलच्या या बॅलेस्टिक मिसाइलचे प्रक्षेपण वजन 17 टन एवढे आहे. महत्वाचे म्हणजे अग्नी-2 मिसाइल 2000 किलो मीटरपर्यंत 1000 किलो ग्रॅमचे पेलोड वाहून नेऊ शकते. तसेच हे मिसाइल, आधुनिक नेव्हिगेशनल सिस्टिमनेही सुसज्ज आहे.

अग्नी-3 - हे मिसाइल मध्यम पल्ल्यापर्यंत डागले जाऊ शकते. याची मारक क्षमता 3,500 किलो मीटरपर्यंत एवढी आहे. या मिसाइलची लांबी 17 मीटर, व्यास 2 मीटर आणि वजन जवळपास 50 टन एवढे आहे. यात स्टेज 2चे प्रोपेलेंट सिस्टिम आहे. तसेच हे 1.5 टन शस्त्र घेऊन जाऊ शकते. अग्नी-3 मिसाइल हायब्रिड नेव्हिगेशन, गाइडन्स आणि कंट्रोल सिस्टमने सुसज्ज आहे. याशिवाय यावर अत्याधुनिक कंप्यूटरही सेट करण्यात आलेले आहे.

अग्नी-4 - अग्नी-4 हे अण्विक क्षमता असलेले मिसाइल आहे. हे सर्फेस टु सर्फेस 4000 किमीपर्यंत मारा करणारे बॅलेस्टिक मिसाइल आहे. हे मिसाइल उड्डाणादरम्यान आलेल्या अडचणी स्वतःच दूर करू शकते. तसेच ते नेव्हिगेशन सिस्टिमनेही सुसज्ज आहे. प्रगत एव्हि‍योनिक्स, फिफ्थ जनरेशन ऑनबोर्ड कंप्यूटर आणि डिस्ट्रिब्यूटेड आर्किटेक्चर टेक्नीकचाही यात वापर करण्यात आला आहे.