पार्सल बॉम्बस्फोटांनी चीन हादरला; ७ ठार

By Admin | Updated: October 1, 2015 03:00 IST2015-10-01T03:00:09+5:302015-10-01T03:00:09+5:30

चीनच्या गुआंग्क्षी या प्रांतात बुधवारी सरकारी इमारतींसह अनेक ठिकाणांना लक्ष्य बनवून करण्यात आलेल्या १५ पार्सल बॉम्बस्फोटात किमान ७ जण ठार आणि अन्य ५१ जण जखमी झाले.

China blasted parcel bomb blasts; 7 killed | पार्सल बॉम्बस्फोटांनी चीन हादरला; ७ ठार

पार्सल बॉम्बस्फोटांनी चीन हादरला; ७ ठार

बीजिंग : चीनच्या गुआंग्क्षी या प्रांतात बुधवारी सरकारी इमारतींसह अनेक ठिकाणांना लक्ष्य बनवून करण्यात आलेल्या १५ पार्सल बॉम्बस्फोटात किमान ७ जण ठार आणि अन्य ५१ जण जखमी झाले.
लियूचेंग काऊंटी आणि आसपासच्या भागात बुधवारी दुपारी ३.५० वाजता हे स्फोट झाले. शॉपिंग मॉल, कारागृह, सरकारी कार्यालये, सुपर मार्केट, परिवहन केंद्र, इस्पितळ, भाजीबाजार आदी ठिकाणी हे स्फोट झाले. या घटनेचा तपशील सरकारी माध्यमांनी त्रोटक स्वरूपात दिला असला तरी सोशल मीडियावरून मिळालेली माहिती पाहता मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने तपास अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: China blasted parcel bomb blasts; 7 killed