बिझनेसमनवर मॉडेलचा दावा

By Admin | Updated: June 18, 2015 01:47 IST2015-06-18T01:47:25+5:302015-06-18T01:47:25+5:30

स्वीडनमधील एका माजी मॉडेलने वॉल स्ट्रीटवरील फायनान्सरवर ८५० दशलक्ष डॉलरचा (५,३७० कोटी रुपये) दावा ठोकला असून, आपल्याला

Business model claims | बिझनेसमनवर मॉडेलचा दावा

बिझनेसमनवर मॉडेलचा दावा

न्यूयॉर्क : स्वीडनमधील एका माजी मॉडेलने वॉल स्ट्रीटवरील फायनान्सरवर ८५० दशलक्ष डॉलरचा (५,३७० कोटी रुपये) दावा ठोकला असून, आपल्याला कामावर ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. न्यूयॉर्क ग्लोबल ग्रुपचे बेंजामिन वे (४३) यांच्यावर हा आरोप करण्यात आला असून, आरोप करणाऱ्या मॉडेलचे नाव हॅना बोवेंग (२५) असे आहे. बेंजामिन यांनी हॅनाची मार्केटिंग चीफ म्हणून नियुक्ती केली होती. कामावर असताना कमी कपडे घालून यावे, तसेच २०१३ मध्ये लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला असा तिचा आरोप आहे.
बेंजामिन वे यांनी हॅनासाठी न्यूयॉर्कमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. याच फ्लॅटमध्ये हॅना बोवेंगवर लैंगिक अत्याचार झाले. डेव्हिड रॅटनरने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार बेंजामिन एक दिवस हॅनाला डीनरसाठी घेऊन गेला. जेवण सुरू असताना त्याने तिच्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळले व नंतर तिच्याशी संबंध ठेवले.
 

Web Title: Business model claims