शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

ब्रिटिश सैनिकांकडून घडली मोठी चूक! शरणार्थी समजून 'तालिबानी दहशतवाद्याला'च नेलं; मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 6:44 PM

ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला आहे.

लंडन - इंग्लंडच्या दहशतवादविरोधी पोलिसांनी मँचेस्टर येथून  एका संशयित तालिबानी दहशतवाद्याला अटक केली. हा अफगाण नागरिक त्याच्या कुटुंबासह ब्रिटिश लष्कराच्या बचाव कार्यातील विमानाने निर्वासित म्हणून इंग्लंडमध्ये पोहोचला होता. पोलिसांनी म्हटले आहे, की हा दहशतवादी कोरोना प्रोटोकॉलमुळे काबूलमधून बाहेर काढल्यानंतर मँचेस्टरमधील एका क्वारंटाईन हॉटेलमध्ये होता. पकडला गेलेला हा अफगाण नागरिक, तालिबानचा गुप्तहेर असल्याचा दावा केला जात आहे. (British anti terrorism police arrest afghan national in manchester as a suspected taliban terrorist)

ब्रिटिश सैन्यानेच दिली होती जागा - डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या 33 वर्षीय अफगाण नागरिकाने आपल्या देशाच्या विशेष दलासोबत आणि ब्रिटिश सैनिकांसोबतही काम केले आहे. जेव्हा काबूलवर तालिबानने कब्जा केला, तेव्हा त्याला इंग्लंडच्या रॉयल एअर फोर्सने एअरलिफ्ट केले होते. या दहशतवाद्याला या विमानात वादग्रस्त पद्धतीने जागा देण्यात आली होती आणि ब्रिटीश सैन्याची सेवा करणाऱ्या अनेक विश्वासू अनुवादकांना काबूलमध्येच सोडण्यात आले.

पाकिस्तानच्या हाती लागला अफगाणिस्तानचा सिक्रेट खजिना? ISI नं 3 विमानात भरून नेले दस्तऐवज!

पोलिसांनी गुप्त ठेवली आहे ओळख - ब्रिटिश पोलिसांनी पकडण्यात आलेल्या अफगाण नागरिकांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही. हा तालिबानी 21 ऑगस्टला पत्नी आणि मुलांसह इग्लंडमध्ये पोहोचला. यानंतर त्याला कोरोना नियमांनुसार मँचेस्टरमधील पार्क इन हॉटेलमध्ये क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. अफगाणिस्तान अजूनही इग्लंडच्या लाल यादीत आहे. तेथून येणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाइन राहणे अनिवार्यपणे आहे.

31 ऑगस्टला करण्यात आली अटक -ब्रिटिश दहशतवादविरोधी पोलिसांनी 31 ऑगस्टच्या पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमधील त्याच्या खोलीत प्रवेश केला आणि कुटुंबासह झोपलेल्या या संशयित तालिबानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली. त्याला लंडनमधील उच्च सुरक्षा असलेल्या एचएमपी बेलमार्शमध्ये ठेवण्यात आले आहे. ही कारवाई अत्यंत संवेदनशील असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ब्रिटिश सैन्याबरोबर काम करणारा हा अफगाण नागरिक तालिबानचा गुप्तहेर होता, असा दावा करण्यात आला आहे. 

टॅग्स :Englandइंग्लंडSoldierसैनिकAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानterroristदहशतवादी