'आसिम मुनीर माझे बॉस नाहीत!'; पाक संरक्षण मंत्र्यांचे खळबळजनक विधान, लष्कराच्या हस्तक्षेपावर ख्वाजा आसिफ कडाडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:15 IST2026-02-20T16:40:25+5:302026-02-20T17:15:59+5:30

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या वादात उडी घेत लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याशी असलेल्या संबंधांवर मोठे विधान केले आहे.

'Asim Munir is not my boss!'; Pakistan Defense Minister's sensational statement, Khawaja Asif lashed out at the army's intervention! | 'आसिम मुनीर माझे बॉस नाहीत!'; पाक संरक्षण मंत्र्यांचे खळबळजनक विधान, लष्कराच्या हस्तक्षेपावर ख्वाजा आसिफ कडाडले!

'आसिम मुनीर माझे बॉस नाहीत!'; पाक संरक्षण मंत्र्यांचे खळबळजनक विधान, लष्कराच्या हस्तक्षेपावर ख्वाजा आसिफ कडाडले!

पाकिस्तानमध्ये सरकार लष्कराच्या इशाऱ्यावर चालते, ही चर्चा जगजाहीर आहे. मात्र, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या वादात उडी घेत लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांच्याशी असलेल्या संबंधांवर मोठे विधान केले आहे. "जनरल आसिम मुनीर हे माझे बॉस नाहीत, माझे बॉस केवळ पंतप्रधान शहबाज शरीफ आहेत," असे ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनंतर पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

लष्कराचे नियंत्रण की सहकार्य?

'फ्रान्स २४ इंग्लिश'ला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांना पाकिस्तानमधील लष्कराच्या वर्चस्वाबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. "पाकिस्तानचा इतिहास पाहता लष्कराने नेहमीच सत्तेवर नियंत्रण ठेवले आहे आणि अनेकदा सत्ता स्वतःच्या हातातही घेतली आहे, हे सत्य आहे. मात्र, सध्या परिस्थिती बदलली आहे," असा दावा आसिफ यांनी केला. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली असून दहशतवाद आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर आव्हाने आहेत, अशा स्थितीत लष्कर केवळ सरकारला सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प आणि लष्करप्रमुखांच्या भेटीची चर्चा

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यानंतर पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी ज्या प्रकारे पुढाकार घेऊन हालचाली सुरू केल्या आहेत, त्यावरून प्रश्न उपस्थित केले जात होते. मुलाखतीदरम्यान विचारण्यात आले की, 'ट्रम्प यांचे लाडके फील्ड मार्शल आसिम मुनीर पाकिस्तान चालवत आहेत का?' यावर उत्तर देताना आसिफ यांनी स्पष्ट केले की, लष्कर केवळ व्यवस्थेचा भाग आहे, ते सरकार चालवत नाहीत.

'भाड्याची फौज' आणि जुन्या चुकांची कबुली

ख्वाजा आसिफ यांनी केवळ लष्करावरच नाही, तर पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणावरही टीका केली. "पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये 'भाड्याची फौज' म्हणून काम केले, ही आमची मोठी चूक होती," अशी कबुली त्यांनी दिली. पाकिस्तानने आपल्या जुन्या चुका अजूनही पूर्णपणे मान्य केलेल्या नाहीत आणि त्याच चुका पुन्हा पुन्हा केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तवही त्यांनी मांडले.

भारताच्या धोक्याचा उल्लेख

नेहमीप्रमाणे आपली बाजू सावरताना त्यांनी भारताचा उल्लेख करायला विसरले नाहीत. "आम्ही सध्या कमजोर अर्थव्यवस्था, दहशतवाद आणि भारताकडून असलेल्या धोक्याचा सामना करत आहोत," असे म्हणत त्यांनी लष्कराच्या हस्तक्षेपाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, "मुनीर माझे बॉस नाहीत" या विधानामुळे ख्वाजा आसिफ यांनी लष्करी वर्चस्वाला आव्हान दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

Web Title : आसिम मुनीर मेरे बॉस नहीं: पाक रक्षा मंत्री का चौंकाने वाला बयान।

Web Summary : पाकिस्तानी रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ ने पीएम शहबाज शरीफ को अपना एकमात्र बॉस बताया, सैन्य नियंत्रण से इनकार किया। उन्होंने अफगानिस्तान में 'किराये की सेना' का उपयोग करने जैसी पिछली गलतियाँ स्वीकार कीं। आसिफ ने जनरल मुनीर की भूमिका पर चर्चा के बीच सेना के प्रभाव को चुनौती देते हुए आर्थिक कमजोरी, आतंकवाद और भारतीय खतरों का हवाला दिया।

Web Title : Asim Munir isn't my boss: Pakistan Defense Minister's shocking statement.

Web Summary : Pakistani Defense Minister Khawaja Asif declared PM Shehbaz Sharif his only boss, denying military control. He admitted past mistakes like using 'mercenary forces' in Afghanistan. Asif cited economic weakness, terrorism, and Indian threats while challenging the army's influence amid discussions of General Munir's role.