शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता सोडणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 24, 2020 16:56 IST

यावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो,असे आपल्याला वाटते. कारण पोस्टल मतदानावर आपल्याला शंका आहे, असे ट्रम्प यांनी म्हणाले आहे.

ठळक मुद्देयावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो - ट्रम्पकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अधिकांश राज्ये मेलच्या सहाय्याने मतदान करून घेण्याच्या विचारात आहेत. मतपत्रीकांपासून मुक्ती मिळवा, मोठी शांतता मिळेल. सत्तेचे कसल्याही प्रकारचे हस्तांतरण होणार नाही - ट्रम्प

वॉशिग्टन - राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता हस्तांतर करणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, निवडणूक निकालासंदर्भात बोलताना, पुढे काय होते, याची वाट पाहावी लागेल, असेही ट्रम्प म्हणाले, ते बुधवारी व्हाईट हाऊसमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे.

यावेळी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयापर्यंतही पोहोचू शकतो,असे आपल्याला वाटते. कारण पोस्टल मतदानावर आपल्याला शंका आहे, असे ट्रम्प यांनी म्हणाले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील अधिकांश राज्ये मेलच्या सहाय्याने मतदान करून घेण्याच्या विचारात आहेत. 

नवा कायदा; आता ग्रॅच्युइटीसाठी 5 वर्षांची प्रतीक्षा संपली, नोकरी करणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

कसलीही गॅरंटी देऊ शकत नाही -पत्रकार परिषदेदरम्यान ट्रम्प यांना विचारण्यात आले, की  विरोधी डेमोक्रॅट जो बिडेन यांच्याकडून त्यांचा पराभव झाला अथवा निवडणूक ड्रा झाली, तर ते सत्तेचे शाततापूर्वक हस्तांतर करतील? यावर ट्रम्प म्हणाले, याची कसलीही गॅरंटी देऊ शकत नाही. मी बॅलेटसंदर्भात सातत्याने तक्रार करत आहे. एका रिपब्लिकनने तर बॅलेटला डिजास्टर म्हणूनही संबोधले आहे. ट्रम्प म्हणाले, सध्यस्थितीत मेल-इन मतपत्रीका येण्याची आशा आहे. मतपत्रीकांपासून मुक्ती मिळवा, मोठी शांतता मिळेल. सत्तेचे कसल्याही प्रकारचे हस्तांतरण होणार नाही. 

मोदींच्या राज्यात देशावर एवढं आहे कर्ज; जाणून घ्या, भारतानं दुसऱ्या देशांना किती दिलं लोन

ट्रम्प यांनी 2016मध्येही डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात निवडणूक निकाल मान्य करण्याचा शब्द देण्यास नकार दिला होता. यावेळी हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचेही हिलरी म्हणाल्या होत्या. नंतर ट्रम्प विजयी तर झाले. मात्र, पॉप्युलर व्होटिंगमध्ये त्यांचा 30 लाख मतांनी पराभव झाला होता. 

कोरोना महामारीचा ट्रम्प यांना फटका बसण्याची शक्यता -अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीला आता केवळ 41 दिवसच शिल्लक आहेत. आणि आतापर्यंत आलेल्या राष्ट्रीय ओपिनयन पोलमध्ये ट्रम्प डेमोक्रेटिक पार्टीचे नेते बिडेन यांच्या मागे आहेत. कोरोना व्हायरस महामारीचा ट्रम्प यांना फटका बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतच कोरोनाने आतापर्यंत सर्वाधिक बळी घेतले आहेत. 

आता आला नवा बँकिंग कायदा, संसदेत मिळाली मंजुरी; ग्राहकांवर होणार असा परिणाम

शांततापूर्वक सत्तेचे हस्तांतर, हा लोकशाहीचा मूल मंत्र -ट्रम्प यांच्या वक्यव्यानंतर, त्यांच्याच पक्षाचे सिनेटर मिट रोमन यांनी ट्विट करत, "शांततापूर्वक सत्तेचे हस्तांतर, हा लोकशाहीचा मूल मंत्र आहे. या शिवाय तर आपला देश बेलारूस होईल. ट्रम्प यांचे विधान स्वीकारार्ह नाही," असे म्हटले आहे.

आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाElectionनिवडणूकUSअमेरिका