शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump : "मोदी महान आहेत, ते वडिलांसमान वाटतात"; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधानांचं भरभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 10:38 IST

Donald Trump And Narendra Modi : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारताच्या नेतृत्वात वारंवार बदल होत होते आणि खूप अस्थिरता होती. मात्र मोदी आल्यावर हे चित्र बदललं असं म्हटलं आहे. कॉमेडियन अँड्र्यू शुल्ट्ज आणि आकाश सिंह यांच्यासोबत 'फ्लॅग्रँट' नावाच्या पॉडकास्टमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली.

नरेंद्र मोदी हे गरजेच्या वेळी कठोर होऊ शकणारे सर्वोत्तम व्यक्ती असल्याचं देखील ट्रम्प यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, "मोदी येण्याआधी भारतात पंतप्रधान बदलले जात होते. प्रचंड अस्थिरता होती. मोदी महान आहेत. ते माझे मित्र आहेत. ते वडिलांसमान वाटतात. ते सर्वोत्तम आहेत..."

२०१९ मध्ये टेक्सासच्या ह्यूस्टनमध्ये 'हाऊडी मोदी'च्या यशाबद्दलही ट्रम्प यांनी भाष्य केलं. त्यावेळी ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. स्टेडियममध्ये लोकांची मोठी गर्दी जमली होती. नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी लोक वेडे होत होते आणि आम्ही आजूबाजूला फिरत होतो... आम्ही सर्वांना हात दाखवत मध्यभागी चालत होतो असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. 

पाकिस्तानचे नाव न घेता ट्रम्प म्हणाले, काही प्रसंगी कोणीतरी भारताला धमकावत होतं आणि मी मोदींना म्हणालो की, मला मदत करू द्या कारण मी त्यामध्ये खूप चांगला आहे. त्यावर मोदींनी आक्रमकपणे उत्तर दिलं की, "मी ही परिस्थिती सांभाळेन आणि जे आवश्यक असेल ते करेन. शेकडो वर्षांपासून आम्ही त्यांचा पराभव केला आहे."

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात जवळचं नातं आहे. पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना 'खरा मित्र' म्हटलं तर ट्रम्प यांनी मोदींच्या नेतृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची नेहमीच प्रशंसा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे अहमदाबाद येथे आयोजित 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी भारतात आले होते. या कार्यक्रमात लाखो लोक सहभागी झाले होते. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतAmericaअमेरिका