शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

आता खोल समुद्रातही दिसला एलियन? अमेरिकी नौदलाच्या निवृत्त अधिकाऱ्याने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 6:08 AM

Alien News: अमेरिकी नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने पाण्याखालील एलियन सापडल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर अमेरिकी सरकारने पाण्याखाली एलियन शोधण्याचा तपास सुरू केला आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकी नौदलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्याने पाण्याखालील एलियन सापडल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर अमेरिकी सरकारने पाण्याखाली एलियन शोधण्याचा तपास सुरू केला आहे.

‘यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’चे (एनओएए) माजी प्रमुख टिमोथी गॅलॉडेट यांनी कॅलिफोर्निया किनाऱ्याजवळील सागरी तळामध्ये अमेरिकी नौदलाने सोनार रेकॉर्डिंगचा वापर करून या शोधाचा दावा केला आहे. एक वस्तू डोंगराला आदळल्यानंतर घसरली आणि थांबली, याबद्दल टिमोथी यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते अमेरिकी नौदलाचे निवृत्त रीअर ॲडमिरल आहे. गेल्या १८ महिन्यात खलाशी, पाणबुडी आणि लष्करी कर्मचाऱ्यांच्या अहवालांचा अभ्यास त्यांनी केला. त्यात समुद्रात अज्ञात वस्तू दिसल्याचे म्हटले होते. याआधीही एलियन्सबाबत दावे करण्यात आले होते, मात्र पहिल्यांदाच अमेरिकी सरकारने त्याची तातडीने चौकशी करण्याचे मान्य केले आहे.

आधीही दिसले होते पाण्याखालील जहाज- यापूर्वी अमेरिकी बॉर्डर पेट्रोल एअरक्राफ्टच्या थर्मल इमेजिंग सीस्टिमने पोर्तो रिकोजवळ अटलांटिक महासागरात प्रवेश करत असलेले हाय-स्पीड जहाज शोधले होते. - जगभरातील यूएफओ (उडत्या तबकड्या) आणि यूएसओ दिसण्याच्या घटनांमध्ये हा शोध नवीन आहे. याआधीच्या प्रकरणांमध्ये २००४ मधील निमित्झ घटना आणि १९७६ मध्ये तेहरानमध्ये यूएफओ दिसणे यांचा समावेश आहे. - या घटनांमुळे शास्त्रज्ञांना विश्वातील इतर ग्रहांवरील जीवनाचा शोध घेण्यासाठी मोठी मदत मिळू शकते.

पाणबुडी तैनात करण्याची शिफारसएलियनची गुपिते उघड करण्यासाठी टिमोथी सखोल संशोधनाच्या महत्त्वावर भर देतात. त्यांनी त्या ठिकाणी रिमोट-नियंत्रित पाणबुडी तैनात करण्याची शिफारस केली. यामुळे नवीन व्हिडीओ फुटेजसह शोधाचे अधिक विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. समुद्राखालच्या या अनोळखी वस्तूंना यूएसओ म्हणून ओळखले जाते. 

टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय