शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: December 25, 2020 20:15 IST

विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत.

ठळक मुद्देजगात बाटलीबंद हवा हजारो रुपयांना विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.ही कंपनी ब्रिटनच्या अनेक ठिकाणांवरील शुद्ध हवा बाटलीत बंद करून विकत आहे.बाटलीबंद हवेचा हा फॉर्म्युला केवळ ज्या शहरांतील हवा श्वास घेण्या योग्य आहे, त्याच शहरांत लागू होईल.

लंडण - पाण्या प्रमाणेच आता 'हवा'देखील बाटलीत कैद होऊ लागली आहे. जगात बाटलीबंद हवा हजारो रुपयांना विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवा आणि घातक स्ट्रेन आढळून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे. येथील अनेक लोक आपल्या घरांपासून दूर अडकले आहेत. अशातच ख्रिसमसनिमित्त अशा लोकांसाठी येथील एका कंपनीने विशेष ऑफर आणली आहे.

ही कंपनी ब्रिटनच्या अनेक ठिकाणांवरील शुद्ध हवा बाटलीत बंद करून विकत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 500MLच्या बाटलीबंद हवेची किंमत किंमत जवळपास 2400 रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत.

हवेचा वास घेतल्याने काय फरक पडेल?आपण विचार करत असाल, की एखाद्या ठिकाणावरच्या हवेचा सुगंध घेतल्याने काय फरक पडेल? असे मानले जाते, की मानवाचे नाक 10 हजार प्रकारचे वेगवेगळे सुगंध घेऊ शकते. मानसशास्त्रज्ञ सांगतात, की आपला मेंदू, एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या सुगंधाला तेथील आठवणींशी जोडतो. मेंदूतील सुगंध आणि आठवणी रेकॉर्ड करणारा भाग एक दुसऱ्यासोबत एकत्रितपणे कार्य करतात. यामुळेच आपल्या 75 टक्के भावना या कुठल्या तरी सुगंधावर आधारलेल्या असतात.

या शहरांत लागू होईल फॉर्म्युला -बाटलीबंद हवेचा हा फॉर्म्युला केवळ ज्या शहरांतील हवा श्वास घेण्या योग्य आहे, त्याच शहरांत लागू होईल. अर्थात दिल्लीतील एखादी व्यक्ती ब्रिटनमध्ये अडकली असेल आणि त्याला दिल्लीतील हवेचा गंध घ्यावा वाटला तर ते योग्य होणार नाही. कारण काल दिल्लीचा AQI शुद्ध हवेच्या स्केलपेक्षाही 5 पट अधिक खराब होती.

टॅग्स :Englandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्याpollutionप्रदूषण