ब्रेकअप के बाद...;त्या'ने प्रत्येक वस्तूचे तुकडे करुन केली ऑनलाइन विक्री

By Admin | Updated: June 19, 2015 12:57 IST2015-06-19T12:44:55+5:302015-06-19T12:57:58+5:30

जर्मनीतील एका अवलियाने प्रेयसीशी ब्रेक अप झाल्यावर तिच्यासोबत वापरलेली कार, सायकल, खुर्ची, सोफ्याचे दोन तुकडे करुन ते विक्रीसाठी ठेवले आहे.

After the breakup ...; he made pieces of each item online and sold online | ब्रेकअप के बाद...;त्या'ने प्रत्येक वस्तूचे तुकडे करुन केली ऑनलाइन विक्री

ब्रेकअप के बाद...;त्या'ने प्रत्येक वस्तूचे तुकडे करुन केली ऑनलाइन विक्री

ऑनलाइन लोकमत

बर्लिन, दि.. १९ - प्रेयसीसोबत ब्रेक अप झाल्याने देवदास होणारे तरुण आपण नेहमीच बघतो. मात्र जर्मनीतील एका अवलियाने प्रेयसीशी ब्रेक अप झाल्यावर तिच्यासोबत वापरलेल्या प्रत्येक वस्तूंचे दोन तुकडे करुन ऑनलाइन विक्रीसाठी ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे यात महागड्या कारपासून ते घरातील टीव्ही, सोफा, सायकल, खुर्ची याचा समावेश आहे. 

 जर्मनीत राहणा-या एका तरुणाने ईबे या वेबसाईटवर अर्धे तुकडे केलेल्या वस्तू विक्रीला ठेवल्या असून या वस्तूंची सध्या सोशल मिडीयावर चर्चा रंगली आहे. der.july या नावाने हे युजर अकाऊंट असून या तरुणाचे नुकतेच त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेक अप झाले आहे. या दुःखात तरुणाने प्रेयसीसोबत वापरलेल्या प्रत्येक वस्तूचे थेट दोन तुकडे केले. यातील एक तुकडा प्रेयसीकडे पाठवून दिला तर दुसरा ईबेवर अपलोड केला. 'लौरा, तुझ्यासोबत घालवलेल्या १२ वर्षांनंतर तुझा प्रत्येक गोष्टीत अर्धा हिस्सा आहे, तुला भविष्यासाठी शुभेच्छा' असा संदेशही त्याने लिहीला आहे. विशेष म्हणजे दुःखाच्या भरात या अवलीयाने लहान वस्तूंसोबतच चक्क टीव्ही, गाडी, सायकल, सोफाष खुर्ची, मोबाईल फोन, लॅपटॉप या महागड्या वस्तूंचेही दोन तुकडे केले आहेत. 

Web Title: After the breakup ...; he made pieces of each item online and sold online