शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पंजशीरमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच; 600 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा, 1000 हून अधिकांनी गुडघे टेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 12:15 PM

रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, "पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत."

काबूल - अफगाणिस्तानातील पंजशीरवरील कब्जावरून तालिबान आणि तालिबान्यांना विरोध करणाऱ्या फोर्सेसमध्ये रक्तरंजित लढाई सुरूच आहे. शनिवारीदेखील येथे रक्तरंजित लढाई झाली. यात अनेक तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे वृत्त आहे. पंजशीरच्या इशान्येकडील प्रांतात सुमारे 600 तालिबानी मारले गेले असून 1,000 हून अधिक तालिबानी दहशतवाद्यांनी गुडघे टेकल्याचा दावा विरोध करणाऱ्या गटाने दिला आहे. स्पुतनिकने अफगाणिस्तानमधील विरोध करणाऱ्या दलांचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे. (Afghanistan panjshir claim resistance forces killed about 600 taliban Terrorist)

रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, "पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत."

अफगाणिस्तानात रक्तरंजित संघर्ष; वर्चस्वासाठी तालिबान-हक्कानी पेटले; गोळीबारात अब्दुल गनी जखमी

तालिबान विरोधी गटाने 600 तालिबान्यांना मारल्याचा दावा केला आहे. तर आम्ही पंजशीरच्या चार जिल्ह्यांवर कब्जा केल्याचा दावा तालिबानने केला आहे. तालिबानचा प्रवक्ता बिलाल करीमी म्हणाला, "आम्ही पंजशीर प्रांतातील सात पैकी चार जिल्हे ताब्यात घेतले आहेत. आता आम्ही पंजशीरच्या दिशेने जात आहोत."

तालिबानला विरोध करणारा गट म्हणाला - आत्मसमर्पण नाही - तालिबानला विरोध करणाऱ्या गटाचे नेते अमरुल्ला सालेह यांनी, तालिबानने या भागावर कबजा केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. मात्र, तालिबान्यांनी फोन, इंटरनेट आणि वीज बंद केल्याने परिस्थिती कठीण झाल्याचेही त्यांनी कबूल केले आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती सालेह म्हणाले, दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे. आम्ही कठीण परिस्थितीत आहोत, यात शंका नाही. आमच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला आहे. मात्र, आमचे सैन्य शरणागती पत्करणार नाही. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी