शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

"मृत्युदंड हा इस्लामचा भाग..."; ४ जणांना गोळ्या घालून मारल्यानंतर, काय म्हणाला तालिबान नेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 19:49 IST

अखुंदजादा म्हणाला, 'आपण शिस्तीचे उपाय, प्रार्थना आणि उपासना करायला हवी. आपण पूर्णपणे इस्लाम स्वीकारायला हवा. इस्लाम केवळ काही विधींपुरता मर्यादित नाही. तर ही अल्लाहच्या सर्व आज्ञांची एक व्यापक व्यवस्था आहे.'

अफगाणिस्तानमध्ये एका हत्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या चार जणांना शुक्रवारी गोळ्या घालून ठार मारण्याची शिक्षा देण्यात आली. या घटनेनंतर आता तालिबानच्या एका नेत्याने, मृत्युदंड इस्लामचा भाग असल्याचे म्हटले आहे. या चारही दोषींना शुक्रवारी एक क्रीडा मैदानात गोळ्या घालण्यात आल्या. महत्वाचे म्हणजे, 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून, पहिल्यांदाच एवढ्या लोकांना एकाच दिवसात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. मानवाधिकार गट आणि संयुक्त राष्ट्रांनी या घटनेचा निषेध केला आहे.

तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबिहुल्लाह मुजाहिदने रविवारी एक ऑडिओ क्लिप जारी केली. यात अखुंदजादा म्हणाला, 'आपण शिस्तीचे उपाय, प्रार्थना आणि उपासना करायला हवी. आपण पूर्णपणे इस्लाम स्वीकारायला हवा. इस्लाम केवळ काही विधींपुरता मर्यादित नाही. तर ही अल्लाहच्या सर्व आज्ञांची एक व्यापक व्यवस्था आहे.'

'इस्लामचा एकही आदेश अपूर्ण सोडू नये' -दक्षिण कंधार प्रांतातील हज प्रशिक्षकांच्या एका चर्चासत्रात ४५ मिनिटांच्या भाषणादरम्यान अखुंदजादा म्हणाला, इस्लामचा एकही आदेश अपूर्ण सोडू नये. अल्लाहने लोकांना त्याची पूजा करण्याचा आणि त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता. तालिबानने सत्तेसाठी अथवा पैशासाठी युद्ध केले नाही, तर इस्लामिक कायदा लागू करण्यासाठी युद्ध केले आहे. गुन्हेगारांना गोळ्या घालण्यावरून होत असलेल्या टीका त्याने यावेळी फेटाळून लावल्या. अफगाणिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने या चारही जणांना हत्येच्या आरोपात दोषी ठरवले होते.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादीTalibanतालिबान