पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा भेदक प्रतिहल्ला! १५ चौक्या ताब्यात, ४० सैनिक ठार केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 00:42 IST2026-02-27T00:42:18+5:302026-02-27T00:42:57+5:30

Afghanistan attacks Pakistan: पाकिस्तानने केलेल्या एअरस्ट्राईकला अफगाणिस्तानचे प्रत्युत्तर

Afghanistan attacked Pakistan in response to the air strike carried out against civilians last week | पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा भेदक प्रतिहल्ला! १५ चौक्या ताब्यात, ४० सैनिक ठार केल्याचा दावा

पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा भेदक प्रतिहल्ला! १५ चौक्या ताब्यात, ४० सैनिक ठार केल्याचा दावा

Afghanistan attacks Pakistan: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष हळूहळू वाढू लागला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने प्रतिहल्ला सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वीच हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानवर हल्ले सुरू करणार असल्याचे अफगाण लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रतिहल्ल्यांनंतर पाकिस्तानी लष्कराच्या चौकीजवळ आगीच्या ज्वाला दिसल्या. याशिवाय, पाकिस्तानी सैन्य चौकीवरून पळून गेले. इस्लामिक अमिरातच्या प्रवक्त्याने सांगितले की, कुनार प्रांतात इस्लामिक अमिरात सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी लष्करी राजवटीचे अंदाजे ४० सैनिक मारले गेले आहेत. एका निवेदनात, जबिहुल्लाह मुजाहिद म्हणाले की इस्लामिक अमिरात सैन्याने त्यापैकी १३ जणांचे मृतदेह हस्तांतरितही केले आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

इस्लामिक अमिरातीच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की, इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तानच्या सैन्याने १५ पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत. एका निवेदनात, जबिहुल्लाह मुजाहिद म्हणाले की इस्लामिक अमिरातीच्या सैन्याने केलेल्या कारवाईमुळे, मोठ्या संख्येने पाकिस्तानी लष्करी सैनिक मारले गेले आणि इतर अनेकांना जिवंत पकडण्यात आले आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष सुरू

अफगाण आर्मी कॉर्प्सच्या पूर्वेकडील क्षेत्राच्या मीडिया कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की गुरुवारी रात्री जोरदार चकमक सुरू झाली. नांगरहार आणि पक्तिया प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्याने अलिकडेच केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डुरंड लाइन सीमेच्या काही भागांमध्ये, खोस्त, पक्तिया, नुरिस्तान प्रांत आणि इतर काही भागात पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली.

-----

पाकिस्तानने हवाई हल्ला केला होता

रविवारी पाकिस्तानच्या लष्कराने अफगाण सीमेजवळ हल्ले केले होते आणि किमान ७० दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केला होता. अफगाणिस्तानने हा दावा फेटाळून लावला आणि महिला आणि मुलांसह अनेक नागरिक मारले गेले असे म्हटले.

Web Title : अफगानिस्तान का पाकिस्तान पर पलटवार, चौकियों पर कब्ज़ा, सैनिक ढेर!

Web Summary : अफगानिस्तान ने पाकिस्तान पर जवाबी हमला किया, जिसमें 15 सैन्य चौकियां कब्ज़े में लेने का दावा किया गया है। अफगान अधिकारियों का कहना है कि कुनार प्रांत में लगभग 40 पाकिस्तानी सैनिक मारे गए। यह कार्रवाई अफगानिस्तान में पाकिस्तानी हवाई हमलों के जवाब में की गई है।

Web Title : Afghanistan counter-attacks Pakistan, claims capturing posts and killing soldiers.

Web Summary : Afghanistan launched a counter-attack against Pakistan, reportedly capturing 15 military posts. Afghan officials claim around 40 Pakistani soldiers were killed in Kunar province. This retaliation follows recent Pakistani airstrikes in Afghan border regions, escalating tensions.