"एक प्रसिद्ध पंतप्रधान मला चावायचा..."; एपस्टीन आयलंडवरील लैंगिक शोषणाबाबत पीडितेचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 18:15 IST2026-02-04T18:13:37+5:302026-02-04T18:15:10+5:30

जेफ्री एपस्टीनच्या 'सेक्स आयलंड'वर नक्की काय घडायचं? एका पीडितेने आपल्या नव्या पुस्तकात एका पंतप्रधानावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. वाचा सविस्तर.

"A famous prime minister wanted to bite me..."; Victim's shocking revelation about sexual abuse on Epstein Island | "एक प्रसिद्ध पंतप्रधान मला चावायचा..."; एपस्टीन आयलंडवरील लैंगिक शोषणाबाबत पीडितेचा खळबळजनक खुलासा

"एक प्रसिद्ध पंतप्रधान मला चावायचा..."; एपस्टीन आयलंडवरील लैंगिक शोषणाबाबत पीडितेचा खळबळजनक खुलासा

न्यूयॉर्क: कुप्रसिद्ध अमेरिकन फायनान्सर जेफ्री एपस्टीन याच्या 'सेक्स स्कँडल'ने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. आता या प्रकरणातील एका पीडितेने लिहिलेल्या पुस्तकामुळे पुन्हा एकदा जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या पुस्तकात पीडितेने एका प्रसिद्ध पंतप्रधानावर लैंगिक शोषणाचे आणि अश्लील कृत्यांचे गंभीर आरोप केले आहेत.

पीडितेने आपल्या पुस्तकात एपस्टीनच्या खाजगी बेटावर घडणाऱ्या काळोख्या कृत्यांचा पाढा वाचला आहे. तिने दावा केला आहे की, या बेटावर केवळ उद्योजकच नाही, तर जगातील शक्तिशाली राष्ट्रांचे नेतेही येत असत. "तो प्रसिद्ध पंतप्रधान मला वारंवार चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा आणि मला अश्लील कृत्ये करण्यास भाग पाडले जायचे, तो मला सगळीकडे चावायचा" असे तिने पुस्तकात नमूद केले आहे.

ही घटना मी जगासमोर या घाणेरड्या कृत्यांची माहिती यावी म्हणून सांगत आहे, असेही या महिलेने स्पष्ट केले आहे. परंतू, तिने आपल्या पुस्तकात या पंतप्रधानाचे नाव लिहिलेले नाही. सीएनएनच्या वृत्तानुसार, पुस्तकाच्या अमेरिकन आवृत्तीत त्यांना "प्रसिद्ध पंतप्रधान" असे संबोधले आहे, तर ब्रिटिश आवृत्तीत त्यांना "माजी मंत्री" असे संबोधले आहे.

पीडितेने सांगितले की एपस्टाईन आणि त्याचे सहकारी तिला नियमितपणे श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांकडे पाठवत होते, तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करत होते. तिला अनेकदा गळा दाबून मारले जात असे, मारहाण केली जात असे आणि रक्तही वाहू लागले. तिने याबद्दल लिहिले जेणेकरून जगाला तिने सहन केलेल्या वेदना समजतील. एका माणसाने तिचा वारंवार गळा दाबला, तिला बेशुद्ध केले आणि तिच्या जीव जाईल असे वाटत असताना हसत होता. जेव्हा तिने दयेची याचना केली तेव्हा तो आणखी हिंसक झाला, असेही तिने नमूद केले आहे. 

Web Title: "A famous prime minister wanted to bite me..."; Victim's shocking revelation about sexual abuse on Epstein Island