शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

झोपलेल्या व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले अन् पुढे जे काही घडले, ते पाहून डॉक्टरही चक्रावून गेले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 23:55 IST

हा धक्कादायक प्रकर घडला चीनच्या हैनान प्रांतातील हायकोऊ येथे...

झोपेत असताना एका व्यक्तीच्या नाकात झुरळ शिरले. मात्र, असे काही घढल्याचे तिला समजले नाही. त्रास होऊ लागल्यानंतर, संबंधित व्यक्ती डॉक्टकांकडे गेली. यानंतर जेव्हा डॉक्टरांनी तपासले, तेव्हा ते स्वतःच चक्रावून गेले. खरे तर, त्या रात्री संबंधित व्यक्तीला तिच्या नाकात आणि घशात काही तरी रेंगाळताना जाणवले होते. यामुळे तिला खोकलाही आला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी आराम मिळाला. यानंतर मात्र, श्वासात दुर्गंधी जाणवू लागल्याने ती व्यक्ती अस्वस्थ झाली. तीन दिवसांनंतरही तिला हा दुर्गंध जाणवतच होता.

पहिल्यांदा तपासले असता काहीही आढळले नाही -हा धक्कादायक प्रकर घडला चीनच्या हैनान प्रांतातील हायकोऊ येथे. 58 वर्षीय पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, तिला दुर्गंधीबरोबरच पिवळी थुंकीही येऊ लागली. यानंतर त्या व्यक्तीने ताबडतोब हेनान रुग्णालयात ईएनटी तज्ञांना दाखवले. मात्र, वरील श्वसनमार्गाच्या तपासणीत काहीही संशयास्पद आढळले नाही.

छातीच्या सीटी स्कॅनमध्ये आढळलं झुरळ -छातीच्या सीटी स्कॅनमध्ये, डॉक्टरांना उजव्या खालच्या लोबच्या पोस्टरियर बेसल सेगमेंटमध्ये एक सावली आढळली. तपासादरम्यान डॉक्टरांना कफभोवती काहीतरी गुंडाळलेले आढळले. कफ साफ केल्यानंतर ते झुरळ असल्याचे समोर आले.ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, यानंतर संबंधित व्यक्तीने रुग्णालयातील श्वसन आणि क्रिटिकल केअर फिजिशियन डॉ. लिन लिंग यांना दाखवले. यानंतर छातीच्या सीटी स्कॅनमध्ये  डॉक्टरांना उजव्या खालच्या लोबच्या बेसल सेगमेंटमध्ये एक सावली आढळली. डॉक्टरांना कफमध्ये काही तरी अडकले असल्याचे दिसून आले. ते साफ केल्यानंतर झुरळ असल्याचे निदर्शनास आले.

डॉक्टरांनी श्वसन नलीकेतून झुरळ बाहेर काढले. यानंतर नलीकाही वारंवार स्वच्छ केली. आता संबंधित व्यक्ती पूर्णपणे ठीक आहे.

टॅग्स :chinaचीन