शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

स्पेलिंग बी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत २५ भारतीय

By admin | Updated: May 28, 2015 23:50 IST

अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत २५ भारतीय स्पर्धक आहेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पेलिंग बी स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत २५ भारतीय स्पर्धक आहेत. या स्पर्धेवर भारतीयांचे वर्चस्व असून गेल्या सहा वेळा अमेरिकन भारतीय मुलांनी ही स्पर्धा जिंकली आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी होत असलेल्या ८८ व्या राष्ट्रीय स्पेलिंग बी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्याचा प्रयत्न भारतीय मुले करतील. कित्येक वर्षापासून भारतीय अमेरिकन मुले ही स्पर्धा जिंकत आहेत. गेल्या वर्षी तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला मिसुरी येथील १४ वर्षांचा गोकुल व्यंकटाचलम या वर्षाचा मुख्य प्रतिस्पर्धी मानला जात आहे. गेल्या वर्षाच्या स्पर्धेतील विजयी स्पर्धक श्रीराम हठवार व अंशुल सुजोय हे दोघे होते. दोघांना हा पुरस्कार वाटून मिळाला होता. स्पेलिंग बी स्पर्धेत पाचव्यांदा सहभागी होणारी १३ वर्षांची वान्या शिवशंकर ही एक मजबूत प्रतिस्पर्धी मानली जात आहे. वान्याने २०१० व २०१२ साली, स्पर्धेत १० वा क्रमांक मिळवला होता. तिची बहीण काव्या २००९ ची विजेती होती. नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा अमेरिकेत १९२५ साली सुरू झाली असून, यावर्षी अमेरिकेतील सर्व ५० राज्ये या स्पर्धेत सहभागी झाली आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला पुरस्कार म्हणून ३५ हजार डॉलर रोख मिळतील.