शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

तेल गळतीच्या हानीसाठी २० अब्ज डॉलर भरपाई

By admin | Updated: April 6, 2016 04:41 IST

सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मेक्सिकोच्या आखातात झालेल्या प्रचंड तेल गळतीमुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी २० अब्ज डॉलर भरपाई देण्याचे ब्रिटिश पेट्रोलियम

वॉशिंग्टन : सहा वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर मेक्सिकोच्या आखातात झालेल्या प्रचंड तेल गळतीमुळे झालेल्या हानीच्या भरपाईसाठी २० अब्ज डॉलर भरपाई देण्याचे ब्रिटिश पेट्रोलियम (बीपी) बलाढ्य बहुराष्ट्रीय तेल कंपनीने मान्य केले आहे. ही तेल गळती ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण पर्यावरणीय दुर्घटना होती व कोणाही एका अपराध्याकडून वसूल केली गेलेली ही आजवरची सर्वाधिक भरपाई आहे.मेक्सिकोच्या आखातात खनिज तेलाचे उत्खनन करण्यासाठी ‘बीपी’ने भाड्याने घेतलेल्या ‘डीपवॉटर होरायजन‘ या रिगवर २० एप्रिल २०१० रोजी स्फोट होऊन आग लागली होती. त्यात रिगवर काम करणाऱ्या १२६ पैकी ११ कामगारांचा मृत्यू झाला होता व १३४ दशलक्ष गॅलन तेलाची गळती होऊन ते समुद्रात पसरले होते.या तेल गळतीमुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीबद्दल भरपाईसाठी अमेरिकेच्या संघीय सरकारखेरीज मेक्सिकोच्या आखाताच्या किनाऱ्यावर असलेल्या अलाबामा, प्लोरिडा, ल्युझियाना, मिस्सिसिप्पी व टेक्सास या राज्यांनी तसेच त्या राज्यांमधील शेकडो नगरपालिकांनी न्यू आॅर्लियन्स येथील न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला होता. न्यायालयाने गेल्या जुलैमध्ये ही तेलगळती ‘बीपी’च्या निष्काळजीपणाने झाल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर कंपनी आणि वादी सरकारे यांच्यात सहमतीने भरपाईची रक्कम ठरविण्यासाठी वाटाघाटी सुरु होत्या. त्यानुसार उभयपक्षी सहमतीने एकूण २०.८ अब्ज डॉलर भरपाईचा प्रस्ताव न्यायालयात सादर केला गेला. संघीय न्यायाधीश कार्ल बार्बियर यांनी सोमवारी त्यास अंतिम मंजुरी देऊन त्यानुसार ‘डिक्री’ मंजूर केली. ही रक्कम कंपनीने पुढील १६ वर्षांत टप्प्याटप्प्याने द्यायची आहे. (वृत्तसंस्था)