शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
2
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
3
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
4
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
5
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
6
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
7
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
8
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
9
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
10
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
11
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
12
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
13
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
15
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
16
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, ५००kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
17
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
18
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
19
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांच्या सर्वच बांधकामांची जबाबदारी आता समग्र शिक्षाच्या अभियंत्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील निधीतून होणारी कामेच हाताळण्याची जबाबदारी यापूर्वी समग्र शिक्षातील ...

जिल्हा परिषदेच्या शाळांना केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या समग्र शिक्षा अभियानातील निधीतून होणारी कामेच हाताळण्याची जबाबदारी यापूर्वी समग्र शिक्षातील अभियंत्यांवर होती. प्रत्येक तालुक्याला एक अभियंता नेमून वर्गखोली, स्वच्छतागृह, स्वयंपाकगृह बांधकाम व इतर दुरुस्तीची कामे या विभागाकडून केली जात होती, तर जिल्हा परिषदेला राज्य व केंद्र शासनाकडून इतर योजनांत मिळालेल्या निधीतील कामे मात्र जिल्हा परिषदेचाच बांधकाम विभाग करायचा. मात्र, बांधकामच्या नियमित कामांमध्ये शाळांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. शिवाय मंत्रालय प्रशासकीय विभागाच्या ज्या योजना अंमलबजावणीसाठी जि. प.कडे हस्तांतरित केल्या असल्या तरीही त्याचे नियमन, वित्तीय व्यवस्थापन, निधी वितरण, कर्मचारी वृंद, त्या संदर्भातील तारांकित प्रश्न, कापत सूचना त्याच विभागाने हाताळणे आवश्यक आहे, अशा स्पष्ट सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारत बांधकाम व सुधारणा, देखभाल व दुरुस्तीची कामांच्या अनुषंगाने विधिमंडळविषयक कामकाजाबाबत सर्व जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यावर आहे. तसेच त्यांच्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे नियंत्रण आहे. ग्रामविकास मंत्रालयीन प्रशासकीय विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा पुरविणे, बांधकाम व दुरुस्तीसाठी निधी देण्याची कोणतीच योजना नाही. शिवाय जिल्हा परिषद बांधकाम विभागात अभियंत्यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असून, नवीन भरतीवरही निर्बंध आहेत. त्यामुळे बांधकामाबाबत एकसूत्रता शक्य होत नाही. त्यामुळे समग्र शिक्षाच्या अभियंत्यांनीच ही कामे करावीत, असे म्हटले आहे.

कोणती कामे करता येणार

यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या जिल्हा विकास योजना, वित्त आयोग, क्रीडा योजना, खनिकर्म, सीआरसी फंड, खासदार व आमदारांचा स्थानिक विकास निधी, सर्व योजनांतील जिल्हा परिषद शाळांची नवीन इमारत / देखभाल व दुरस्तीची कामे, विशेष दुरुस्ती, संरक्षक भित, खेळाचे मैदान, उराचा रस्ता, स्वयंपाकगृह अश सर्व मंजूर बांधकामाचे पर्यवेक्षण, अंदाजपत्रके तयार करणे, तांत्रिक मान्यता देऊन बांधकाम करून घेण्याची जबाबदारी समग्र शिक्षाअंतर्गत कार्यरत कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता समग्र यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. १ जुलै रोजी हा आदेश काढण्यात आला.

जि. प.तून निसटतोय विभाग

जिल्हा परिषदेकडून अनेक योजना राज्याच्या कार्यालयांकडे वळविल्या आहेत. आणखी एक विभाग या कचाट्यातून मुक्त करण्याची पहिली पायरी या रुपाने ओलांडली आहे. उर्वरित बाबींमध्ये पदाधिकाऱ्यांना फारसे महत्त्व तसेही नसते. असे झाले तर आणखी एक विभाग हातचा जाण्याची भीती आहे.