हिंगोलीत पाणीटंचाईने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:31 IST2021-03-16T04:31:07+5:302021-03-16T04:31:07+5:30

राहुल वसंतराव भोसले (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत राहुल भोसले हा घरी पाणी नसल्याने गावाशेजारील हरी ...

Victim taken due to water shortage in Hingoli | हिंगोलीत पाणीटंचाईने घेतला बळी

हिंगोलीत पाणीटंचाईने घेतला बळी

राहुल वसंतराव भोसले (वय १३) असे मृत मुलाचे नाव आहे. मृत राहुल भोसले हा घरी पाणी नसल्याने गावाशेजारील हरी वसू यांच्या शेतातील ग्रामपंचायतच्या सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी गेला होता. सकाळी पाण्याच्या दोन खेपा घरी आणून टाकल्या होत्या. तिसऱ्या खेपेसाठी परत विहीरीवर गेला होता. मात्र यावेळी पाणी काढण्याची बकेट विहिरीतील आतील कठड्यावर पडली. याच वेळी कठड्यावर पडलेली बकेट काढत असताना त्याचा पाय घसरून तो विहिरीत पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पो.ह एस.पी. सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी वसंतराव भोसले यांच्या खबरीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे. तपास एस.पी. सांगळे करीत आहेत.

Web Title: Victim taken due to water shortage in Hingoli