अपघातात निशाना येथील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:29+5:302021-02-23T04:46:29+5:30

तालुक्यातील निशाना येथील सोपान फुलाजी सावळे (वय २३), भागवत कोंडबा सावळे (वय २३) हे दोघे दुचाकीने औंढ्यावरून गावाकडे निशाना ...

Two people were killed in the accident | अपघातात निशाना येथील दोघे ठार

अपघातात निशाना येथील दोघे ठार

तालुक्यातील निशाना येथील सोपान फुलाजी सावळे (वय २३), भागवत कोंडबा सावळे (वय २३) हे दोघे दुचाकीने औंढ्यावरून गावाकडे निशाना येथे परत येत होते. रात्री ९.३०च्या सुमारास त्यांची दुचाकी पिंपळदरी पाटी परिसरात आली असता समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील सोपान सावळे यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर भागवत सावळे यांचा हिंगोली येथे दवाखान्यात नेत असताना मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, फौजदार गणेश राठोड, एकबाल शेख, गोरे, नंदकुमार पाटील यांनी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दोघेही उदरनिर्वाहासाठी औंढा येथील दुकानावर काम करीत होते. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी औंढा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

Web Title: Two people were killed in the accident