शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विरुद्ध दिशेने वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST

बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे पाणी ...

बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय करावी

हिंगोली: शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. एस. टी. महामंडळाच्या आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

वीजपुरवठा खंडित : शेतकरी त्रस्त

कळमनुरी: तालुक्यातील ग्रामीण भागात १५ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. विहिरींना सद्य:स्थितीत भरपूर प्रमाणात पाणी असतानाही वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

वळण रस्ते बनले खड्डेमय

आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्ते मागील काही दिवसांपासून खड्डेमय बनले आहेत. खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. वेळोवेळी संंबंधित विभागाला सांगण्यात आले, परंतु, अद्यापतरी कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. संबंधित विभागाने वळण रस्त्यावरील खड्डे डांबरमिश्रीत गिट्टी टाकून बुजवावेत, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

शिरडशहापूर येथे दिवसाही पथदिवे सुरु

शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील बाजारगल्ली, रजा मोहल्ला, मारोती मंदिर आदी परिसरात दिवे सुरू आहेत.

याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतला कळविले. परंतु, कोणीही अद्यापतरी लक्ष दिले नाही. ग्रामपंचायतच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन दिवसा सुरू असलेले पथदिवे बंद करावेत, अशी मागणी होत आहे.

वानरांचा बंदोबस्त करा ; नागरिकांची मागणी

हिंगोली: शहरातील कापडगल्ली, शास्त्रीनगर, गंगानगर, शिवाजीनगर, जिजामातानगर, तोफखाना आदी भागात वानरे छतावरून उड्या मारत आहेत. अंगणात ठेवलेल्या वस्तूंची नासाडी करीत करीत आहेत. वानरांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास अंगावर धावून येत आहेत. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.