लघुसिंचनच्या कारभाराची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:32+5:302021-07-07T04:36:32+5:30

जिल्हा परिषद सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही या विभागाकडून कामे होत नाहीत. परस्पर कामे करण्यावर जास्त जोर असल्याची सार्वत्रिक तक्रार ...

There will be an inquiry into the management of irrigation | लघुसिंचनच्या कारभाराची होणार चौकशी

लघुसिंचनच्या कारभाराची होणार चौकशी

जिल्हा परिषद सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही या विभागाकडून कामे होत नाहीत. परस्पर कामे करण्यावर जास्त जोर असल्याची सार्वत्रिक तक्रार होती शिवाय अनेक कामे रखडून पडल्याने या विभागाबाबत नाराजी वाढली होती. दरवर्षीच या विभागाकडून नियोजनाचा घोळ घातला जातो शिवाय केलेल्या नियोजनातही वारंवार फाटे फोडून ही कामे लटकवली जातात, असा सदस्यांचा आरोप आहे. शिवाय इतर अनेक तक्रारी होत्या. त्यातच निविदा निघण्यापूर्वीच या या विभागाची दोन कामे झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर जि. प. सदस्य यशोदा दराडे यांनी या विभागाचे कार्यकारी अभियंता वाघमारे रूजू झाल्यापासूनच्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. याबाबत लघु सिंचनच्या औरंगाबाद येथील प्राधिकरणाकडून चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Web Title: There will be an inquiry into the management of irrigation