शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात दहा घरफोड्या, तेव्हढ्याच दुचाकीही पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

हिंगोली : जिल्हा पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोठ्या गुन्ह्याची उकलही तेवढ्याच तत्परतेने केली आहे. ...

हिंगोली : जिल्हा पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोठ्या गुन्ह्याची उकलही तेवढ्याच तत्परतेने केली आहे. मात्र भुरट्या चोरांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. मागील एक ते दीड महिन्यात चोरट्यांनी दहा दुचाकी लांबविल्या असून तेवढ्याच घरफोड्या केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे टाकले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सर्वच बाजूंनी तपास करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यशही आल्याचे दिसत आहे. हिंगोली शहरालगत असलेल्या सुराणा नगरातील दरोडा प्रकरणातील दरोडेखोरांचा छडा लावून त्यांना जेलची हवा दाखविली आहे. त्यानंतर बासंबा पोलीस ठाणे हद्दीत एका महिला कर्मचाऱ्याला दिवसा लुटणाऱ्या लुटारूंना काही तासातच पकडण्याची किमयाही पोलिसांनी केली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी सेनगाव तालुक्यातील वृद्ध महिलांचा खून करणाऱ्या सिरियल किलरलाही बेड्या ठोकण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. एकीकडे कौतुकास्पद कामगिरी केली जात असताना दुसरीकडे भुरट्या चोरांनी पोलिसांचे काम वाढविले आहे. मागील एक ते दीड महिन्यात जिल्ह्यात तब्बल दहा घरफोड्या झाल्या आहेत. यातून हजारोंचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. यातील एक ते दोन गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यानंतर मात्र इतर चोरीच्या घटनेतील आरोपी अद्याप हाती लागले नसल्याचे चित्र आहे. अधून-मधून चोरीच्या घटना घडतच आहेत. घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे टाकले आहे.

दुचाकी चोरटेही सक्रिय

जिल्ह्यात मोबाइल, दुचाकी चोरटेही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे दुचाकी, मोबाइल चोरीच्या घटनाही घडत आहेत. मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार केली असता मोबाइल हरवला असल्याची नोंद घेतली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेकजण मोबाइल चोरीला जाऊनही तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र दुचाकी चोरीला गेल्याची नोंद घेतली जात आहे. मागील एक ते दीड महिन्यात तब्बल दहा दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. त्यामुळे दुचाकी चोरटे सक्रिय झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे दुचाकीचालक वाहन उभी करताना विशेष काळजी घेत आहेत.