शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील निम्म्या पोलीस ठाण्यांचे टेलिफोन बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यातील १३ पैकी निम्मे पोलीस ठाण्यांतील टेलिफोन नंबर बंदच राहत आहेत. त्यामुळे एखाद्या घटनेची तत्काळ माहिती द्यायची ...

हिंगोली : जिल्ह्यातील १३ पैकी निम्मे पोलीस ठाण्यांतील टेलिफोन नंबर बंदच राहत आहेत. त्यामुळे एखाद्या घटनेची तत्काळ माहिती द्यायची असल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक नंबरची शोधाशोध करावी लागत असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्याला दिलेले टेलिफोन बंद का ठेवले जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हाभरात हिंगोली शहर, हिंगोली ग्रामीण, आखाडा बाळापूर, औंढा नागनाथ, बासंबा, वसमत शहर, वसमत ग्रामीण, गोरेगाव, हट्टा, कळमनुरी, कुरुंदा, नरसी नामदेव, सेनगाव अशी १३ पोलीस ठाणे कार्यरत आहेत. काही पोलीस ठाण्यांतर्गत डोंगरी भाग येतो. तसेच काही भागात दररोजच काही ना काही घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांना २४ तास सतर्क राहावे लागत आहे. त्यात कोरोना संसर्गजन्य आजाराने पोलिसांचे काम वाढविले आहे. पोलीस प्रशासन अशाही स्थितीत नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे पेलत आहे. या कामात गती येण्यासाठी तसेच पोलीस ठाण्यांशी तत्काळ संपर्क साधता यावा यासाठी पोलीस प्रशासनाने प्रत्येक पोलीस ठाण्याला टेलिफोन (मोबाइल) दिले आहेत. नागरिकही आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याचा नंबर नेहमी लक्षात ठेवतात. मात्र काही दिवसांपासून १३ पैकी निम्मे पोलीस ठाण्यांचे टेलिफोन नंबरच लागत नसल्याचा आरोप होत आहे. यासाठी पोलीस ठाण्याच्या टेलिफोन नंबरवर संपर्क साधून खात्री केली असता असता मोजक्याच पोलीस ठाण्यांचा टेलिफोन नंबर सुरू असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे दुर्गम भागात काही घटना, अपघात घडल्यास पोलीस ठाण्याशी कसा संपर्क साधावा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

..पोलीस ठाण्यांचा नंबर बंदच

पोलीस ठाण्यांचा संपर्क नंबर बंदच असतो, असा आरोप होत असल्याने यासंदर्भात पडताळणी केली असता सायंकाळी ६ ते ६.१५ वाजेच्या दरम्यान जिल्ह्यातील हिंगोली शहर, बासंबा, गोरेगाव, सेनगाव, हट्टा, कळमनुरी, वसमत ग्रामीण अशा सात पोलीस ठाण्यांचा संपर्क नंबर बंद आढळून आला. या पोलीस ठाण्याचा संपर्क नंबर नेहमीच बंद राहत असल्याचा आरोपही होत आहे, तर इतर पोलीस ठाण्यांचा संपर्क नंबर सुरू असल्याचे पहावयास मिळाले.