राज्य पुरस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST2021-02-13T04:28:32+5:302021-02-13T04:28:32+5:30

यात जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या चार दिवसीय राज्यस्तरीय पुरस्कार परीक्षेसाठी शिबिर प्रमुख म्हणून ...

State Awards Camp | राज्य पुरस्कार शिबिर

राज्य पुरस्कार शिबिर

यात जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या चार दिवसीय राज्यस्तरीय पुरस्कार परीक्षेसाठी शिबिर प्रमुख म्हणून पुणे भारत स्काउट आणि गाइड जिल्हा संघटक सुभाष बोथीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. शिबिर सहायक संजय गिरी व तुळशीराम हजारे यांनी यशस्वीरीत्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये गणवेश, वचन व नियम, इतिहास, ध्येय, हस्तांदोलन, स्काउट गाइड प्रार्थना, झेंडागीत, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, भारत स्काउट आदींचा समावेश होता. शिवाजी माध्यमिक विद्यालय येथील पवन बर्गे, किसन बेले, रितेश बेले, सचिन धनवे, नागेश्वर सरकटे हे पाच विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यात पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यपाल यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जे.एन. असोले, अमोल मुसळे, माधुरी दळवी, रतन भोपाळे, बेले ज्ञानेश्वर, घुगे अनिल आदी मान्यवर उपस्थित होते. फोटो नं.०९

Web Title: State Awards Camp