शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

दोन सभापतींसह एका सदस्याविरुद्धची याचिका निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

हिंगोली- जिल्हा परिषदेतील बहुचर्चित सभापती निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय ऊर्फ भैया देशमुख यांच्यासह चंद्रभागा देवराव जाधव व ...

हिंगोली- जिल्हा परिषदेतील बहुचर्चित सभापती निवड प्रक्रियेदरम्यान झालेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय ऊर्फ भैया देशमुख यांच्यासह चंद्रभागा देवराव जाधव व सभापती बाजीराव रामजी झुंबडे या तिघांविरोधात याचिकेवर सुनावणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण निकाली काढले असून, अनर्हतेची मागणी फेटाळली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत सभापती व विशेष समित्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवीन चार समिती सभापती पदाच्या निवडीकरिता १४ जानेवारी २०२० रोजी निवड प्रक्रिया पार पडली.

तत्पूर्वी १३ जानेवारी रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जि.प. गटनेते म्हणून दिलीप देशमुख यांनी पक्ष सदस्यांची बैठक घेऊन पक्षाचे निर्देश म्हणजेच व्हिप जारी केला होता. त्यानुसार निवडणुकीत सभापतीपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये पक्षाकडून सतीश पाचपुते यांना समाजकल्याण व कैलास साळुंखे यांना विशेष समिती सभापती पदाचे उमेदवार ठरविण्यात आले होते; परंतु पक्षातील गैरअर्जदार असलेल्या तीन सदस्यांनी सदर पक्ष निर्देशाविरुद्ध मतदान केले. ज्यामुळे पक्ष उमेदवारांचा पराभव झाला, असे म्हणणे मांडत सदरील सदस्यांच्या बाबतीत महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता अधिनियम १९८६ चे कलम ३ (१) ब नुसार याचिका दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केली होती. सदर याचिकेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात अकरा वेळा सुनावणी ठेवण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी निकाल राखून ठेवला असता, १४ सप्टेंबर २०२० रोजी अर्जदार दिलीप देशमुख यांनी सदर प्रकरण परत चालविण्याची विनंती करीत म्हणणे मांडण्याची संधी मागितली. त्यानंतर या प्रकरणावर पुन्हा आठ वेळा सुनावणी ठेवण्यात आली. ज्या दरम्यान अर्जदारांना कोणताही साक्ष किंवा ठोस पुरावा न्यायालयासमोर ठेवता आला नाही. परिणामी, जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अर्जदार दिलीप देशमुख यांचा विवाद अर्ज नामंजूर केला. यामुळे गैरअर्जदार संजय देशमुख, चंद्रभागा जाधव व बाजीराव जुमडे यांच्या अनर्हताबद्दल दाखल केलेली याचिकादेखील निकाली निघाली आहे. गैरअर्जदार यांच्यावतीने ॲड. मिलिंद गाजरे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली.