शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा उलगडा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणार रिवार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथील दुहेरी खुनाचा उलगडा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रिवार्ड देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. ...

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील साखरा येथील दुहेरी खुनाचा उलगडा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रिवार्ड देणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी ११ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांची उपस्थिती होती.

सेनगाव तालुक्यातील साखरा येथील भारजाबाई मारोती इंगळे यांचा दोन दिवसापूर्वी खून करून मृतदेह अर्धवट अवस्थेत पुरल्याबाबत उघडकीस आले होते. यापूर्वीही मनकर्णाबाई तुळशीराम सरूळे यांचा खून झाल्याची घटना घडली होती. खुनाच्या दोन घटना घडल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे होते. त्यामुळे पथके स्थापन करून तपासाच्या सूचना दिल्या होत्या. यामध्ये स्थागुशाचे पो.नि. उदय खंडेराय, सेनगाव पो.नि. कृष्णदेव पाटील, सपोनि दीक्षा लोकडे, अभय माकणे, स्थागुशाचे पो.उप.नि. शिवसांब घेवारे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लेकूळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, किशोर कातकडे, राजूसिंग ठाकूर, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत, विठ्ठल काळे, ज्ञानेश्वर पायघण, आकाश टापरे, खंदारे यांचा समावेश होता.

या पथकाने सर्वच बाजूंनी तपास करीत खुनाचा उलगडा करत आरोपी दिलीप आंबादास लाटे यास ताब्यात घेतले. दोन्ही खुनाचा उलगडा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रिवार्ड देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, जिल्ह्यात इतरही खुनाच्या घटनेतील आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वासही कलासागर यांनी व्यक्त केला.