हिंगोलीत कोविड सेंटरमध्ये नातेवाइकांना मिळतोय मुक्त प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST2021-03-21T04:28:15+5:302021-03-21T04:28:15+5:30

जिल्हा रुग्णालयातच ढिलाई जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी समोरील पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. शिवाय गेटपासून ...

Relatives get free access to Kovid Center in Hingoli | हिंगोलीत कोविड सेंटरमध्ये नातेवाइकांना मिळतोय मुक्त प्रवेश

हिंगोलीत कोविड सेंटरमध्ये नातेवाइकांना मिळतोय मुक्त प्रवेश

जिल्हा रुग्णालयातच ढिलाई

जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी समोरील पॅसेजमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. शिवाय गेटपासून ते दुसऱ्या मजल्यावरील खोलीपर्यंत जाताना त्यांना कोणीही हटकत नाही. वर जाण्यास सहसा कोणी विरोध करीत नाही. कोणी अधिकारी आला की, नावापुरता विरोधाचा प्रयत्न होतो. मात्र, सवय झालेले नातेवाईक त्यामुळे ऐकत नाहीत.

वाद घातला तर प्रवेश

औंढा रोडवरील अल्पसंख्याक वसतिगृहाच्या इमारतीत सुरक्षा रक्षकाकडून गेटवरच अडविले जाते. डबा द्यायचा झाला तर नातेवाइकांना फोन करून रुग्णास बोलवावे लागते. शिवाय पोलीसही असल्याने नातेवाईक घाबरतात. जर रक्षक एकटा असेल तर वाद घालून काहीजण जाण्याचा प्रयत्न करतात.

हा प्रकार गंभीर, मात्र थांबविला जाईल

जर कोविड सेंटरमध्ये नातेवाईक थेट जात असतील, तर हा प्रकार गंभीर आहे. रुग्णांसाठी जेवणासह सर्व व्यवस्था केल्याने नातेवाइकांनी तेथे जाण्याचे कारण नाही. तसे यापुढे होणार नाही, यासाठी सक्त सूचना दिल्या जातील. हा प्रकार न रोखल्यास कारवाईही करण्याचा इशारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला.

Web Title: Relatives get free access to Kovid Center in Hingoli