खुडज येथील कृषिपंपाची वीजजाेडणी ताेडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:36+5:302021-02-24T04:31:36+5:30

खुडज : सेनगाव तालुक्यातील खुडज येथील गावठाणसह कृषिपंपाची वीजजाेडणी ताेडण्यात आली असून, शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार महावितरणकडून ...

The power supply of the agricultural pump at Khudaj was cut off | खुडज येथील कृषिपंपाची वीजजाेडणी ताेडली

खुडज येथील कृषिपंपाची वीजजाेडणी ताेडली

खुडज : सेनगाव तालुक्यातील खुडज येथील गावठाणसह कृषिपंपाची वीजजाेडणी ताेडण्यात आली असून, शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार महावितरणकडून हाेत आहे.

सतत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने अनेक शेतीकामांना अडथळा निर्माण हाेत आहे. यामुळे वेळेत कामे पूर्ण हाेत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त हाेत आहे. दि. २२ फेब्रुवारीला गावातील, तर २३ फेब्रुवारीला कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला. यानंतर घरगुती वीजमीटरचे वीजबिल तसेच कृषिपंपाचे बिल भरण्यास वेठीस धरण्यात येत अनेकांची वीजजाेडणी ताेडण्यात आली आहे.

अगाेदरच सततची नापिकी, नंतरचा दुष्काळ व अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यातच महावितरणकडून वीजबिल भरण्यासाठी वेठीस धरण्याचा प्रकार किवा वीजजाेडणी ताेडणी यामुळे शेतकरी चिंतित आहे. कारण रब्बी हंगामातील पिकांबराेबरच फळबागा, भाजीपाला पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यामुळे खरिपाबराेबर रब्बीतील पीक हातचे जात असल्याने शेतकरी महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र राेष व्यक्त करत आहेत.

Web Title: The power supply of the agricultural pump at Khudaj was cut off