प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:40+5:302021-02-24T04:31:40+5:30

मजुरांचे स्थलांतर वाढले औंढा नागनाथ : मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा होत आहे. यामुळे तालुक्यातील बरेच मजूर ...

The plight of the migrant shelter | प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

मजुरांचे स्थलांतर वाढले

औंढा नागनाथ : मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा होत आहे. यामुळे तालुक्यातील बरेच मजूर कामाच्या शोधात आपल्या कुटुंबीयांसह परगावी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर कामाचा तुटवडा होईल व काम हाताला लागणार नाही, अशी भीती मजुरांना भेडसावू लागली आहे.

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

कळमनुरी : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच पिकांचे नुकसान झाले आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसांमुळे शेतशिवारातील बहरलेले गहू, हरभरा, हळद व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसत आहे.

प्रवाशांची संख्या घटली

वसमत : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आता कोरोनाची धास्ती पुन्हा नागरिक घेऊ लागले आहेत. याचाच परिणाम वसमत शहरातील बसस्थानकावर दिसून येत आहे. मागील दोन दिवसांपासून या बसस्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे.

Web Title: The plight of the migrant shelter