दुचाकीच्या धडकेत एक ठार ; एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:02+5:302021-04-09T04:32:02+5:30

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील रमेश जगताप (वय ४४) व त्यांचा भाचा नागेश शिवाजी थोरात (वय १९ रा. हिरडी) हे ...

One killed in a two-wheeler collision; One injured | दुचाकीच्या धडकेत एक ठार ; एक जखमी

दुचाकीच्या धडकेत एक ठार ; एक जखमी

हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील रमेश जगताप (वय ४४) व त्यांचा भाचा नागेश शिवाजी थोरात (वय १९ रा. हिरडी) हे दोघे दुचाकीने चिंचाळा येथून भांडेगावकडे जात होते. त्यांची दुचाकी चिंचाळा पाटी परिसरात आली असता समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक बसली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले होते. या वेळी काही जणांनी तातडीने फाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. माहिती मिळताच रूग्णवाहिका काही वेळातच दाखल झाली. रूग्णवाहिकेतील डॉ. सुनील पोहकर व चालक काकडे यांनी तत्काळ जखमींना उपचारासाठी हलविले. परंतु, हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात नेत असतानाच नागेश शिवाजी थोरात यांचा मृत्यू झाला. तर जमखीवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ. सुनील पोहकर यांनी दिली.

Web Title: One killed in a two-wheeler collision; One injured