शिक्षण विभागाला न.प.ने करवसुलीसाठी ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:27+5:302021-03-20T04:28:27+5:30

१९ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सील ठोकले आहे. ...

NP seals education department for tax collection | शिक्षण विभागाला न.प.ने करवसुलीसाठी ठोकले सील

शिक्षण विभागाला न.प.ने करवसुलीसाठी ठोकले सील

१९ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सील ठोकले आहे. या विभागाकडे १३ लाखांचा कर थकला आहे. सदर पथकात उप-मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे, प्रशासकीय आधिकारी श्याम माळवटकर बी.के राठोड, डी.बी ठाकूर, पंडित मस्के, संदीप घुगे, माधव घुगे, विजय हेलचल, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे, अनिल गालफाडे, नितीन पवार, अफसर पठाण आदी कर्मचारी उपस्थित होते.

नगरपालिकेची मार्च एण्डचे उद्दिष्ट गाठण्यासाठी करवसुलीसाठी विविध भागात पथके फिरत आहेत. शहरातील अनेकांकडे मोठी थकबाकी आहे. या मालमत्ताधारकांकडे जवळपास ४ कोटींपेक्षाही जास्त थकबाकी आहे. ती न भरल्यास इतरांवरही कारवाई केली जात आहे. अनेकांची नळ जोडणी तोडण्यात आली आहे. अनेकांनी कोरोनामुळे गतवर्षीही कर भरला नव्हता. त्यामुळे पालिकेची अडचण झाली आहे. यंदा थकबाकीसह कर भरण्याचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी केले आहे. अन्यथा पालिकेकडून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Web Title: NP seals education department for tax collection