शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत महिला रुग्णांसाठी आता स्वतंत्र कोरोना केअर सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:08 IST

independent corona care center for female patients in Hingoli महिलांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर निर्माण करून त्या ठिकाणी महिला डॉक्टर व स्टाफची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देमहिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीही लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. असा उपाय करणारा हिंगोली राज्यातील पहिला जिल्हा असण्याची शक्यता आहे. 

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत असून, महिलांमध्येही हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. महिला रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांच्यासाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह औंढा रोड, लिंबाळा मक्ता येथे करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टर व स्टाफमध्येही महिलाच राहणार आहेत, असा उपाय करणारा हिंगोली राज्यातील पहिला जिल्हा असण्याची शक्यता आहे. 

हिंगोली जिल्ह्यात आता कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मागील सात ते आठ दिवसांपासून रोज ५० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय राहात आहे. अशावेळी महिलांसाठी स्वतंत्र कोरोना केअर सेंटर निर्माण करून त्या ठिकाणी महिला डॉक्टर व स्टाफची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. या ठिकाणी सुरक्षा रक्षकही महिलाच राहणार आहेत. महिलांना या ठिकाणी उपचार घेताना सुरक्षितता व तेवढीच सहजता वाटावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात असा उपक्रम राबविणारा हिंगोली हा पहिला जिल्हा ठरण्याची शक्यता आहे.

महिला समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्तीही लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये करण्यात आली आहे. यात कडती उपकेंद्रातील डॉ. वैष्णवी कापसे, डिग्रस कऱ्हाळेच्या डॉ. संगीता टार्फे, भटसावंगीच्या डॉ. रूपाली मकासरे, जांभरुण तांडा येथील मंजूषा कऱ्हाळे, राहोली येथील डाॅ. सय्यद आलिया समरीन, लोहगावच्या डॉ. शांता कऱ्हाळे यांचा समावेश आहे. १६ ते २२ मार्च या कालावधीत या डॉक्टर या ठिकाणी सेवा बजावणार आहेत. यानंतर पुन्हा वेगळ्या डॉक्टरांचे पथक नेमले जाणार आहे. यात दिरंगाई केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.अनेक जण कुटुंबाची काळजी वाटत असल्याने चाचणी करून घेण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. आता महिलांसाठी स्वतंत्र कोरोना सेंटर उभारण्यात आल्याने यात बदल होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली