शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कचेरीत प्रवेशास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत चालला असून, संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारीही मोठ्या ...

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढत चालला असून, संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. शासकीय अधिकारी व कर्मचारीही मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. शासन आदेशाप्रमाणे १५ एप्रिलपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दीडशे ते दोनशे रुग्ण दररोज आढळत आहेत. यात संपूर्ण टाळेबंदीही करण्यात आली होती. आता या टाळेबंदीला शिथिलता दिली आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तरीही दोन दिवस टाळेबंदी राहणार आहे. मात्र, शासकीय कार्यालयांत यापूर्वी प्रवेशाला मनाई नव्हती. आता शासन आदेशाप्रमाणेच ही मनाई असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना आत प्रवेश मिळत नाही. केवळ स्टाफलाच आत प्रवेश करता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामांबाबत भ्रमणध्वनीवर किंवा ई-मेलवर संपर्क साधण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

अनेकवेळा ग्रामस्थ गावातील तक्रारींची निवेदने घेऊन येतात तर आता पाणीप्रश्‍नावर निवेदने दिली जावू शकतात. त्यामुळे शासकीय कार्यालयांमधून गर्दी होऊन कोविडचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यालयात १५ एप्रिलपर्यंत नागरिकांनी येऊ नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत.