‘त्या’ जवानाचा खून अनैतिक संबंधातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:22+5:302021-03-19T04:28:22+5:30

हिंगाेली राज्य राखीव पोलीस दलातील जवान राजकुमार उत्तमराव पवार (वय ३७) यांचा १७ मार्च रोजी लोहगाव शिवारातील एका विहिरीत ...

The murder of 'that' soldier was due to an immoral relationship | ‘त्या’ जवानाचा खून अनैतिक संबंधातूनच

‘त्या’ जवानाचा खून अनैतिक संबंधातूनच

हिंगाेली राज्य राखीव पोलीस दलातील जवान राजकुमार उत्तमराव पवार (वय ३७) यांचा १७ मार्च रोजी लोहगाव शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळून आला होता. त्यांना जबर मारहाण केल्याचे दिसत होते. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी यतीश देशमुख, सपोनि. बी.आर. बंदखडके, पोउपनि. कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा उत्तमराव पवार यांच्या फिर्यादीवरून बंडू श्यामराव चव्हाण (रा. जांभळी तांडा, ह.मु. पेन्शनपुरा, हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १६ मार्च रोजी राजकुमार पवार हे त्यांचा मित्र बंडू श्यामराव चव्हाण यांच्यासोबत भगवान आडे यांना भेटण्यासाठी कारने जांभरून येथे गेले होते. पाहुण्याला भेटल्यानंतर ते परत येत असताना लोहगाव शिवारात रात्री ९ वाजेच्या सुमारास एका दुसऱ्या वाहनासोबत झालेल्या अपघातावरून लोहगाव येथील चौघांसोबत वाद निर्माण झाला होता. याच संधीचा फायदा घेत बंडू चव्हाण याने राजकुमार पवार यांना जबर मारहाण करून खून करत प्रेत लोहगाव शिवारातील एका विहिरीत टाकून दिले. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाचा राग मनात धरूनच चव्हाण याने खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, सपोनि. बी.आर. बंदखडके यांनी पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. तायडे, रविकांत हारकळ, शेख महंमद, अशोक धामणे, चव्हाण आदींचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. हे पथक रात्रभर आरोपीचा शोध घेत होते. अखेर १८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता आरोपी बंडू चव्हाण यास रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. तपासानंतरच खुनाचे रहस्य उलगडणार आहे.

Web Title: The murder of 'that' soldier was due to an immoral relationship