शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद कर्मचाऱ्यांचा १ मे पासून काम बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST

हिंगोली: कोरोना विषाणूने बाधित होऊन नगरपालिका व नगर पंचायतमधील कर्मचारी मयत पावत आहेत. त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. ...

हिंगोली: कोरोना विषाणूने बाधित होऊन नगरपालिका व नगर पंचायतमधील कर्मचारी मयत पावत आहेत. त्यांना कोणतीही सुविधा मिळत नाही. एवढे असताना राज्य शासन नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. १ मे पर्यंत नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

नगर पालिका, नगर पंचायती मधील सफाई कामगार, पाणीपुरवठा मजूर व इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना दोन-दोन महिने वेतन वेळेवर मिळत नाही. त्यामु्ळे कोरोना काळात त्यांची उपासमार होत आहे. याचबरोबर इतर मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. कोरोना परिस्थितीत नगर परिषद, नगर पंचायतचे कर्मचारी फ्रंटलाईनवर काम करत आहेत. मागील आठ ते दहा दिवसांमध्ये विविध नगर पालिका, नगर पंचायती मधील पंधरा ते वीस कर्मचारी कोरोनाबाधित होऊन मयत पावलेले आहेत. या प्रकाराची शासनाने साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे मयत कुटुंबीयाचे संसार उघड्यावर आले आहे.

दिवसेंदिवस कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्यातील इतर आस्थापनामध्ये १५ टक्के उपस्थिती ठेवण्याची सूचना शासनाच्या वतीने देण्यात आली आहे. परंतु, अत्यावश्यक सेवा असे कारण सांगत नगरपरिषद, नगरपंचायतीची उपस्थिती शंभर टक्के ठेवून कोणतेही विमा संरक्षण न देता कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण व त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार समोर येत आहे. ३० एप्रिलपूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात शासनस्तरावर निर्णय झाला नाही तर राज्यातील नगर परिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपाध्यक्ष धर्माजी खिल्लारे, रामेश्वर वाघमारे, दीपक रोडे, जयसिंग कचवाहा, अनुप खरारे, पी. बी. भातकुले, धनराज पिलवाह, प्रशांत नकवाल, संजय कुंभार, रत्नाकर अडशिरे, व्ही. टी.लहाने, गिरीष डुबेवार, सुभाष मोरे, हरिदास सोनुने, देवराम मुके, निलेश सपकाळ, किशोर भावसार, किरण अहेर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.