शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेले मास्क यंत्रामार्फत केले जातात नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. स्वच्छता बाळगा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना नगर परिषद देत ...

हिंगोली : कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. स्वच्छता बाळगा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना नगर परिषद देत असली तरी अनेकजण मात्र नियमांकडे कानाडोळा करताना दिसून येत आहेत. असे असले तरी नगर परिषद मात्र दोन वर्षांपासून कचऱ्यातील मास्क एकत्र करून ते यंत्राद्वारे जाळून टाकण्याचे काम करीत आहे.

हिंगोली शहराची लोकसंख्या आजमितीस दीड लाखांच्या घरात आहे. दररोज शहरातून ३० टन कचरा निघत असतो. यामध्ये सुका कचरा १२.३१ टन, तर ओला कचरा १२.२ टन रोज निघत असतो. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यानंतर त्यातून मास्क बाजूला काढले जातात. ही प्रक्रिया २३ मार्च २०२० पासून आजतागायत नित्याने सुरू आहे. कचऱ्यातील मास्क बाजूला काढण्याचे काम तीन कर्मचाऱ्यांकडे नगर परिषदेने सोपविले आहे. यासाठी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर हे स्वत: लक्ष देऊन काम करवून घेतात. कोरोनाने गतवर्षी सर्वत्र शिरकाव केला. त्याच वेळी नगर परिषदेने इन्सीरेशन मशीन (भस्मीकरण यंत्र) विकत घेतले आहे. तेव्हापासून आजतागायत मास्क यंत्रात टाकून जाळण्याचे काम केले जाते.

प्रतिक्रिया

गत दोन वर्षांपासून कोरोनाचे रुग्ण खूप आढळून येत आहेत. तेव्हा नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर नियमितपणे करावा. वापरलेले मास्क व सॅनिटायझर बॉटल इतरत्र न टाकता कचराकुंडीत टाकावी, जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही.

- सनोबर तसमीम, कनिष्ठ अभियंता, नगर परिषद

बॉक्स

दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?

दररोजचा कचरा एकत्र कचराकुंडीत पडत असला तरी त्याचे वर्गीकरण केले जाते. कचऱ्यात पडलेले मास्क बाजूला काढण्यासाठी नगर परिषदेने चेतन बुजगावणे, दिनकर शिंदे, रवी गायकवाड या तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यानंतर मास्क यंत्राच्या साह्याने जाळले जातात.

बॉक्स

रुग्णालयातील कचऱ्याचे काय केले जाते?

रुग्णालयातील औषधी बॉटल, प्लास्टिक कचरा एकत्र साचला जात असला तरी त्यातून मास्क बाजूला काढून ते जाळले जातात. नगर परिषदेची घंटागाडी नियमीत येते. त्यामुळे कचरा टाकण्यास सोयीस्कर होते. ज्यावेळेस घंटागाडी उशिरा येते त्या वेळेस कचऱ्याची दुर्गंधी सुटणार नाही, याची खबरदारी घेतली जाते, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

शहरात रोज निघणारा कचरा-३० टन

१६.२ टन ओला कचरा

१२.३१ टन सुका कचरा