शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्रेक दी चेन’च्या निर्बंधांना ‘ब्रेक’ देत बाजारपेठ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

हिंगोली : मागील महिनाभरात दोनदा टाळेबंदीचा सामना करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर सोमवारी फुटला. सोमवारी व्यापाऱ्यांनी ‘ब्रेक ...

हिंगोली : मागील महिनाभरात दोनदा टाळेबंदीचा सामना करणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या संयमाचा बांध अखेर सोमवारी फुटला. सोमवारी व्यापाऱ्यांनी ‘ब्रेक दी चेन’च्या नियमांनाच ‘ब्रेक’ देत बाजारपेठेतील सर्वच दुकाने सुरू केली. पोलीस, महसूल वा इतर कोणतीही यंत्रणा त्यांना प्रतिबंध करण्याच्या भानगडीत पडली नाही. हिंगोली जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारीच दुकाने उघडण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांसमवेत व्यापारी महासंघाच्या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्याचदिवशी असल्याने दुकाने उघडण्यात आली नव्हती. शनिवारी व रविवारी वीकेंड लाॅकडाऊनचे प्रतिबंध पाळण्याची तयारी आधीपासूनच व्यापाऱ्यांनी दाखवली होती. त्यामुळे दोन दिवस जीवनावश्यक वगळता इतर दुकाने बंद होती. सोमवारी सकाळी बाजारपेठेत सर्व व्यापारी तयारीनेच आले होते. सर्वांनीच आपापली दुकाने उघडल्याने सर्व बाजारपेठ खुली झाली. हे पाहून आधी पोलिसांनी याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सगळी बाजारपेठच उघडली. व्यापारी व ग्राहकांचे टोळके रस्त्यावर ठिकठिकाणी जमलेले होते. त्यामुळे पोलिसांनी निर्बंधांना झुगारणाऱ्यांना पुढे काही विचारणा केली नाही.

राज्य शासनानेही कालच्या बैठकीत १४ तारखेनंतर टाळेबंदी लावण्याचे संकेत दिले आहेत. त्याचाही परिणाम आज बाजारपेठेवर दिसून आला. जर टाळेबंदी लागणारच असेल तर त्यापूर्वी नागरिकांना त्यांच्या निकडीच्या वस्तू घेता याव्यात, यासाठी प्रशासनानेही ढील दिल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून व्यापारी महासंघाच्या दोन्ही संघटनांकडून दुकाने उघडण्यात येतील, असे सांगितले जात होते. तर व्यापाऱ्यांनी सामूहिक दुकाने उघडण्याचे आवाहनही केले होते. त्यामुळे सोमवारी दुकाने उघडल्याचे पहायला मिळाले.

ग्रामीण भागातून गर्दी वाढली

सोमवारी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात हिंगोलीत खरेदी करायला आल्याचे पहायला मिळाले. अनेकजण साठा करण्यासाठी माल घेऊन जात असल्याचे दिसून आले. टाळेबंदी झाली तर ग्रामीण भागात मालाची टंचाई होऊ नये म्हणून अनेक दुकानदार काळजी घेत आहेत.

व्यापारी महासंघाचे पदाधिकारी रस्त्यावर

हिंगोलीत सोमवारी सर्वच व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली होती. त्याला प्रशासनाकडून विरोध झाल्यास एकत्रितपणे लढा देण्यासाठी व्यापारी महासंघाचे पदाधिकारीही रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. मात्र, प्रशासनातील काहींनी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर कोणतीही कारवाई न करता प्रशासनाने दुकाने सुरू राहू देणेच पसंत केले.