Maratha Reservation : मराठा बांधवांनी शेत बांधावरून केला केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 02:00 PM2021-05-07T14:00:07+5:302021-05-07T14:03:04+5:30

Maratha Reservation: औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा शिवारात झाले आंदोलन

Maratha Reservation: Maratha brothers protest against Central and State Government over farm dam! | Maratha Reservation : मराठा बांधवांनी शेत बांधावरून केला केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध !

Maratha Reservation : मराठा बांधवांनी शेत बांधावरून केला केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध !

googlenewsNext
ठळक मुद्दे शेत बांधावरुन ते दिल्लीच्या तख्तापर्यत लढाईचा निर्धार

जवळा बाजार : मराठा आरक्षण रद्द केल्याने समाज बांधवातून तीव्र असंताेष आहे. सकल मराठा बांधवांच्यावतीने आजरसाेंडा शिवारातील शेत बांधावरून राज्य व केंद्र सरकारचा आज सकाळी ११ वाजता जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा शिवारात ७ मे रोजी सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयाविराेधात येथील शेत बांधावरून केंद्र शासन व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी आंदोलकांनी काळे मास्क लावून दोन्ही सरकार विरोधात जोरदार घाेषणाबाजी केली. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नव्याने लढाईची सुरुवात शेतीच्या बांधावरून करण्यात आली आहे. पुन्हा एकदा नव्या जोमाने अखंडित लढाई सुरू करणार असल्याचे समाज बांधवांच्यावतीने सांगण्यात आले आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शेती बांधावरुन ते दिल्लीच्या तख्तापर्यत ही लढाई सुरूच राहील, असा निर्धार सर्वांनी याप्रसंगी व्यक्त केला.
 

Web Title: Maratha Reservation: Maratha brothers protest against Central and State Government over farm dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.