हरवलेली पर्स पोलिसांनी अर्ध्या तासात मिळवून दिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:36+5:302021-07-07T04:36:36+5:30

श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी योगिनी एकादशीच्या निमित्ताने परिसरातील भाविक नर्सी येथे दाखल झाले होते. यावेळी गर्दीमध्ये ...

The lost purse was recovered by police in half an hour | हरवलेली पर्स पोलिसांनी अर्ध्या तासात मिळवून दिली

हरवलेली पर्स पोलिसांनी अर्ध्या तासात मिळवून दिली

श्री संत नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी योगिनी एकादशीच्या निमित्ताने परिसरातील भाविक नर्सी येथे दाखल झाले होते. यावेळी गर्दीमध्ये एका महिलेची पर्स हरवली. यावेळी महिलेने पर्स हरवल्याची तोंडी तक्रार नर्सी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीची दखल घेत अवघ्या अर्ध्या तासात पर्स मिळवून दिली.

शकुंतलाबाई साहेबराव देशमुख (रा. पानकनेरगाव) ही महिला भाविक दर्शनासाठी आली होती. या महिलेची पर्स नर्सी बसस्थानक ते संत नामदेव मंदिर या दरम्यान हरवली. लगेच महिलेने पर्स

हरवल्याची तोंडी तक्रार नर्सी पोलीस ठाण्यात दिली. यावेळी नर्सी पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गिरी, पोउपनि गणेश जाधव, हेमंत दराडे व पुडंगे यांनी तपासाची चक्रे फिरवून हरवलेली पर्स महिलेच्या स्वाधीन केली.

Web Title: The lost purse was recovered by police in half an hour