शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीत मोठी दुकाने बंद; हातगाडे मात्र रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली. ...

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली. जिल्हा प्रशासनाचे नियम सर्वांसाठी एकच असल्याने मोठी दुकाने बंद असली तरी गल्लीबोळांतील दुकाने आणि रस्त्यावरील हातगाडे मात्र सर्रास फिरताना आढळून आली. न. प. व पोलिसांचे संयुक्तिक पथक मात्र तेथेपर्यंत पोहोचत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बघता-बघता सहा दिवस उलटूनही गेले आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे पाहून जिल्हाधिकारी जयवंशी यांनी मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात सात दिवसांची टाळेबंदी केली होती. तरीही काही फरक पडला नसल्याचे पाहून परत २९ मार्च ते ४ एप्रिल अशी सात दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. रस्त्याने विनाकारण आणि विनामास्क फिरणाऱ्यांना दंड लावण्यात यावा, यासाठी नगर परिषद आणि पोलिसांकडे शासनाने जबाबदारी दिली आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे पथकातील कर्मचारी हे विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंडही वसूल करीत आहेत; परंतु शहरातील गल्लीबोळांत मात्र काहीजण दिवसा आणि रात्री टोळक्याने बसत आहेत. यामध्ये बहुतांश जण हे विनामास्कच पाहायला मिळत आहेत. टाळेबंदी असतानाही गल्लीबोळांतील किराणा दुकाने सर्रासपणे सुरूच आहेत. ग्राहक मिळो अथवा न मिळो, हातगाडेही रस्त्याने वावरताना दिसत आहेत. बहुतांश हातगाडा चालकांना मास्कही नाही. टाळेबंदीतील नियम हे सर्वांसाठी एकच असल्याने हातगाडे चालक का रस्त्याने फिरत आहेत? कोरोना संसर्गाची भीती त्यांना वाटत नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गल्लीबोळांत पथक पाठविले जाणार

बाजारपेठेतील मोठे व्यापारी हे जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत आहेत. गल्लीबोळांतील छोटे दुकानदार व हातगाडेवाले पालन करीत नसतील तर त्यांना दंड भरावाच लागेल. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहून गल्लीबोळांतही पथकातील कर्मचारी पाठविले जातील.

- बाळू बांगर, स्वच्छता निरीक्षक, नगर परिषद